Headlines

उंडणगावचे आरोग्य केंद्रच आजारी:जिल्हा परिषद सदस्यांची अचानक भेट, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह‎




उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन वाघ यांनी नुकतीच मंगळवारी सकाळी अचानक भेट दिली असता रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे हे रुग्णालयच आजारी असल्याचे दिसून आले आहे. आरोग्य केंद्रातील अनेक गंभीर त्रुटींमुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी तपासणी दरम्यान ओपीडी नोंद रजिस्टर मेंटेन नसल्याचे व फार्म शिष्ट जवळचे रजिस्टर उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे येणाऱ्या रुग्णांची नोंद व्यवस्थित ठेवली जात नसल्याचे दिसून आले तसेच केंद्रातील स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत दयनीय असून परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली दिसून आली. आरोग्य केंद्रात दोन डॉ. शुभम माने, डॉ. विशाल साळुंखे नियुक्त असतानाही तपासणी वेळी एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यामुळे येथे आलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला. ऑपरेशन थिएटरमध्ये अत्यावश्यक सुविधा नसून फोकस लाइटच्या अभावी केवळ १० कॅटच्या सीएफएल बल्बच्या उजेडात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची गंभीर बाब समोर आली. लाईट नसल्यास मोबाईल टॉर्च च्या प्रकाशात शस्त्रक्रिया पार पाडाव्या लागतात असे कर्मचाऱ्यांनी सांगितले पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही अत्यंत खराब असून वापरास लागणाऱ्या पाण्याच्या हौदात कचरा साचलेला होता. त्याच दूषित पाण्याचा वापर होत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पंखे बंद अवस्थेत तसेच लाईट व्यवस्था निकृष्ट तसेच इमारतीतील स्लॅबचे प्लास्टर कोसळलेले आणि फरशा निघालेल्या अवस्थेत आढळले. आरोग्य केंद्रातील शौचालयांची स्थितीही दयनीय दिसून आली. चारपैकी दोन शौचालये पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत तर उर्वरित दोन सुरू असली तरी त्यामध्ये प्रचंड अस्वच्छता असून रुग्ण व नातेवाईकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य केंद्रात किमान ६ कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचेही स्पष्ट झाले. या सर्व प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जि.प. सदस्य वाघ यांनी या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल तयार करून संबंधित अधिकाऱ यांकडे सादर करण्याची माहिती दिली असून तातडीने सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांवर वचक नाही, काही कर्मचारी गैरहजर उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून येथे मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. कर्मचाऱ्यांवर वचक नसून काही कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन वाघ यांनी दिली. डोळे दुखत असल्यामुळे मी नेत्रतज्ञांकडे तपासणीसाठी गेलो होतो. तपासणीस काही वेळ लागल्यामुळे मला उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यास उशीर झाला. तोपर्यंत जिल्हा परिषद सदस्य भेट देऊन निघून गेले होते. त्यानंतर मी येऊन रुग्ण तपासणी केली डॉ. शुभम माने आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडणगाव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *