अनधिकृत बांधकामांना राज्य सरकारचा दणका:बेकायदा सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीवर बंदी; फसवणूक रोखण्यासाठी महसूल विभागाचे आदेश
राज्यातील वाढत्या अनाधिकृत बांधकामांना आणि त्यातून होणाऱ्या सामान्य नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. यापुढे सक्षम प्राधिकरणाची रीतसर परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या बांधकाम प्रकल्पांमधील सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी केली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश राज्याच्या महसूल विभागाने काढले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार…