गेल्या दोन दिवसांमध्ये दीड लाख भाविकांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन:उत्तर भारतातील भाविकांची जास्त संख्या, मंदिर परिसरात महाप्रसाद वाटप
वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी तिसऱ्या श्रावण सोमवारीही शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीपासूनच भाविकांची गर्दी वाढली होती, तर दिवसभरात हजारो भाविकांनी श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले आहे. हा तिसरा श्रावण सोमवार . भाविकांनी श्री घृष्णेश्वर दर्शनाबरोबरच लेणी पाहण्याचाही आनंद घेतल्याने लेणी परिसरही भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. पोलिस प्रशासनाच्या वतीने श्री घृष्णेश्वर मंदिरासह…