कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी टाळ वाजवा आंदाेलन:निफाड नगरपंचायतीकडून लवकरच कार्यवाहीचे लेखी आश्वासन; भाजपचे आंदोलन मागे
शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी निफाड शहर भाजपच्या वतीने बुधवारी (दि. ३०) नगरपंचायत कार्यालयासमोर टाळ वाजवत आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबतचे निवेदन नगरविकास मंत्री, जिल्हाधिकारी नाशिक, संचालक नगरपालिका प्रशासन, तहसीलदार निफाड, पोलिस निरीक्षक निफाड व मुख्याधिकारी निफाड नगरपंचायत यांना देण्यात आले. शहरात…