Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता महापालिकेचे अग्निशमन दल मैदानात

शहरात मागील काही दिवसांपासून भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याच्या आणि कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व कुत्रे पकडण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आयुक्त यशवंत डांगे यांनी कोंडवाडा विभागाच्या मदतीला अग्निशमन दलाला पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंस्र आणि मोकाट कुत्री…

Read More

शाळेच्या अंगणात ‘मातीची प्रयोगशाळा’:मुलांनी पिकवलं आलं, वडगाव आनंदच्या शाळेत सेंद्रिय पद्धतीने आल्याचे पीक, विद्यार्थ्यांना ‘बियाणे ते उत्पादन’चा प्रत्यक्ष धडा‎

शेती म्हणजे केवळ शेतकऱ्याचा विषय आणि पर्यावरण म्हणजे पुस्तकातील धडा, ही पारंपरिक चौकट मोडीत काढत वडगाव आनंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी थेट मातीत हात घातला आहे. शाळेच्या परिसरातील परसबाग आता विद्यार्थ्यांसाठी केवळ हिरवाईचा को . या परसबागेत सध्या आल्याचे पीक जोमाने वाढले असून, हिरव्यागार पानांनी शाळेचा परिसर बहरला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सहभागातून…

Read More

गट नंबर गायब; ठेंगोड्यात ई-पीक पाहणीचा खोळंबा:तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्याची ॲड. नंदलाल आहिरे यांची मागणी; तहसीलदारांना निवेदन‎

ई-पीक पाहणी प्रणालीमध्ये ठेंगोडा येथील अनेक गट नंबर उपलब्ध नसल्याने तसेच काही गटांचे भौगोलिक स्थान व जीपीएस लोकेशन नकाशावर योग्यरित्या दिसत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांची नोंद करणे शक्य होत नाही. या तांत्रिक त्रुटींमुळे पीकविमा, नैसर्गिक आपत्तीतील नुकस . ई-पीक पाहणीच्या ऑनलाइन प्रणाली व मोबाईल ॲपमध्ये गावातील अनेक गट क्रमांक दिसत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही गट…

Read More

चांदवडला रोजगार महाकुंभात 447 विद्यार्थ्यांच्या रोजगाराचे स्वप्न साकार:828 उमेदवारांनी दिल्या मुलाखती; ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराची दारे खुली‎

चांदवड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ८२८ विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी २६२ मुले व १८५ मुली अशा एकूण ४४७ विद्यार्थ्यांची थेट . १५ नामांकित कंपन्यांनी घेतला मेळाव्यात सहभाग रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्स, बजाज ऑटो, ह्युंदाई मोटर, महिंद्रा अँड महिंद्रा, किर्लोस्कर यांसह विविध १५…

Read More

सांस्कृतिक महोत्सव:सटाण्यात 28 कला प्रकारांमध्ये 850 ‎विद्यार्थ्यांकडून कलागुणांचे सादरीकरण‎

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘जल्लोष’ विभागीय सांस्कृतिक युवक महोत्सवात २२ महाविद्यालयांतील ८५० विद्यार्थ्यांनी तब्बल २८ कला प्रकारांत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. सटाण्याच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने विविध कला प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मालेगाव येथील म.स.गा. महाविद्यालयाच्या संघाने उपविजेतेपद मिळविले. सावित्रीबाई फुले पुणे…

Read More

RSS ची देशभरात NRC लागू करण्याची मागणी:म्हटले- मतदार यादीची तपासणी झाली पाहिजे; कोण भारतीय नागरिक, कोण नाही जाणून घेणे आवश्यक

स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) आणि जनगणनेबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आरएसएसने देशभरात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (NRC) लागू करण्याची मागणी पुन्हा केली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर म्हणाले की, कोण भारतीय नागरिक आहे आणि कोण नाही, हे स्पष्ट झाले पाहिजे. आंबेकर म्हणाले की, मतदार यादीत चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झालेल्या गैर-नागरिकांची ओळख पटवणे आवश्यक…

Read More

सटाण्यात मंत्र्यांचा ताफाच अडकला काेंडीत‎:वाहनचालकांसाठी रोजची कोंडी. मात्र व्हीआयपींसाठी काही मिनिटांत मार्ग मोकळा‎

बागलाण तालुका दौरा आटोपून नाशिकच्या दिशेने जात असताना आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या ताफ्याला सटाणा शहरातील रखडलेल्या रस्ता कामाचा फटका बसला. दोधेश्वरनाका ते जिजामाता उद्यान या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मंत्र्यांच्या ताफ्यालाही वाहतूक कोंडीत अडकावे लागले. परिस्थिती लक्षात घेत पोलिस प्रशासनाने शिवतीर्थाजवळ वाहतूक थांबवली. त्यानंतर मंत्र्यांच्या ताफ्यासाठी विरुद्ध दिशेने मार्ग…

Read More

Amitabh Bachchan Injured on KBC Set

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोड़पती १८’च्या सेटवर घसरले. त्यामुळे त्यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. अलीकडील भागात अमिताभ बच्चन यांनी या अपघाताची माहिती दिली. अमिताभ सहसा शोची सुरुवात विंग्समधून धावत येऊन आणि स्टेजच्या मध्यभागी उभे राहून आपल्या मोनोलॉगने करतात. मात्र, पायात वेदना असल्यामुळे त्यांनी यावेळी बसून भागाची सुरुवात केली. त्यांनी प्रेक्षकांना…

Read More

महिलांची सव्वादोन कोटींची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला अखेर अटक:विंचूरच्या दिव्यज्योत संस्थेच्या माध्यमातून महिलांना गिरणी, वॉशिंग मशीनचे आमिष‎

महिलांना मोफत शिवणकाम व ब्युटीपार्लर प्रशिक्षण देण्यासह शासकीय योजनेंतर्गत शिलाई मशीन आणि १५ हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून हजारो महिलांची सव्वादोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी पती-पत्नीला लासलगाव पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून अटक केली. संजय बोराळे व जयश्री बोराळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नाशिक जिल्ह्यातील विविध…

Read More

कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी टाळ वाजवा आंदाेलन‎:निफाड नगरपंचायतीकडून लवकरच कार्यवाहीचे लेखी आश्वासन; भाजपचे आंदोलन मागे‎

शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी निफाड शहर भाजपच्या वतीने बुधवारी (दि. ३०) नगरपंचायत कार्यालयासमोर टाळ वाजवत आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबतचे निवेदन नगरविकास मंत्री, जिल्हाधिकारी नाशिक, संचालक नगरपालिका प्रशासन, तहसीलदार निफाड, पोलिस निरीक्षक निफाड व मुख्याधिकारी निफाड नगरपंचायत यांना देण्यात आले. शहरात…

Read More