वर्धा एमआयडीसीत उद्योगांऐवजी भूखंडांचा बाजार?:उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानंतर कारवाईकडे लक्ष
वर्धा एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या निर्देशांनंतर औद्योगिक भूखंडांच्या प्रत्यक्ष वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उद्योग उभारणीसाठी शासनाकडून भूखंड उपलब्ध करून दिले जात असताना, काही भूखंडधारकांकडून हे भूखंड प्रत्यक्ष उद्योग न उभारता पुढे विक्रीस काढले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्योगासाठी राखीव असलेली जमीन गुंतवणूक आणि…