Headlines

सैनिक सीमावर्ती भागांत दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना करणार:श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे लष्कराला प्रतिकात्मक मूर्ती सुपूर्द




श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने भारतीय लष्करातील जवानांसाठी गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्ती सीमावर्ती भागांत पाठवल्या आहेत. कारगिल, जम्मू, अयोध्या आणि राजस्थानसह विविध सीमावर्ती भागांमध्ये सैनिक या मूर्तींची प्रतिष्ठापना करणार आहेत. पुण्यातून या मूर्ती नुकत्याच संबंधित लष्करी तुकड्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारतीय लष्कराच्या २४, ५, १९, १ मराठा लाइट इन्फन्ट्री युनिटच्या सैनिकांना या मूर्ती देण्यात आल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, तुषार रायकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांना गणेशोत्सवात पुण्यात येऊन सहभागी होणे शक्य होत नाही. त्यामुळे यंदाही मराठा लाइट इन्फन्ट्री युनिटचे सैनिक कारगिल, जम्मू, अयोध्या आणि राजस्थानसह देशातील विविध सीमावर्ती भागांमध्ये श्रींच्या प्रतिकात्मक मूर्तींची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतील. या बटालियनच्या सैनिकांनी सीमावर्ती भागात दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ट्रस्टने सैनिकांच्या या इच्छेचा आदर करत श्रींची हुबेहुब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. हा उपक्रम सलग १६ वर्षांपासून सुरू असून, यात सहभागी होणाऱ्या बटालियनची संख्या वाढत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, २०११ पासून मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. सीमेवरील लष्करी ठाण्यांमध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने सैनिकांना एक वेगळी ऊर्जा मिळते. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करते. यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागांमध्ये केली जाते. यंदाही ट्रस्टतर्फे लष्करातील मराठा बटालियनला या मूर्ती देण्यात आल्या आहेत. सीमावर्ती भागांत देशातील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असल्याने बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी भावना सैनिकांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *