Headlines

फुलंब्रीत विविध पक्षांचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल:श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंबईत पक्षप्रवेश; स्थानिक समीकरणे बदलण्याची शक्यता




फुलंब्री विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढत आहे. विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश झाला. यामुळे आगामी काळात फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकिसन पठाडे यांचे तिकीट नाकारल्यानंतर भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पक्षांतराचे सत्र सुरू आहे. याच घडामोडींदरम्यान, १ सप्टेंबर रोजी मुंबईत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये फुलंब्रीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, संभाजीनगर बाजार समितीचे संचालक गणेश दहीहंडे, माजी संचालक भास्कर मुरमे, भगवान वाघ, माजी सभापती राजू घोगरे, पंचायत समिती गटनेते अनुराग शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्याणराव शेळके, सरपंच भाऊसाहेब देवकर यांचा समावेश आहे. याशिवाय नगरसेवक प्रशांत नांगरे, जमीर पठाण, पवन घोडके, मुदसर पटेल, उमेश दुतोडे यांच्यासह अनेक नगरसेवक व सरपंचांनीही शिवसेनेत प्रवेश केला. भीमराव पठाडे, आसिफ पटेल, राजेंद्र पळसकर, नारायण पळसकर, दादाराव पळसकर, परमेश्वर मते, तातेराव मते, पुंजाराम मते, प्रमोद मुठे, गौतम जाधव, राजू मते हे पदाधिकारी व कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले. या पक्षप्रवेशावेळी पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार विलास भुमरे, जिल्हाप्रमुख रमेश पवार, जिल्हा परिषद गटनेते राधाकिसन पठाडे, तालुकाप्रमुख मनोज शेजूळ आणि चंद्रकांत जाधव उपस्थित होते. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा मानला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *