किशोरवयीन मुलींसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम:साई हेरिटेजमध्ये 'तुमचं भविष्य, तुमचे निर्णय' विषयावर व्याख्यान
अमरावती येथे बालरंगभूमी परिषद आणि सोमेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने साई हेरिटेजमध्ये किशोरवयीन मुलींसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘तुमचं भविष्य, तुमचे निर्णय’ या विषयावर प्रसिद्ध समुपदेशक संजय उताणे यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानात संजय उताणे यांनी किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याची काळजी, सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय, एच.पी.व्ही. लसीकरणाचे महत्त्व आणि…