चौगावमध्ये घरगुती वीज तोडल्याने महावितरणविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार:ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी
चौगाव आधीच शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या घरातील वीजजोडणी तोडण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात आल्याने चौगाव येथे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शनिवारी (दि. ३१) दुपारी १२ वाजेच्या सुमारास महावितरणच्या उप अभियंता गुरव व वायरमन यांनी काही शेतकऱ्यांच्या घरी जाऊन वीजजोडणीच्या तारा कापल्याचा प्रकार घडला. या कारवाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र…