Headlines

लाडसावंगीच्या पी.एम. श्री शाळेमध्ये विद्यार्थिनींना कराटे, योगाचे प्रशिक्षण:पालकांकडून उपक्रमाचे कौतुक, प्रशिक्षक अशोक नाईक यांचा पुढाकार




लाडसावंगी येथील पी.एम. श्री शाळेत विद्यार्थिनींच्या शारीरिक, मानसिक विकास आणि सुरक्षेच्या दृष्टीने स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. शाळेतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून, यात प्रशिक्षक अशोक नाईक हे विद्यार्थिनींना कराटेचे विविध बारकावे आणि स्वसंरक्षणाचे तंत्र अगदी बारकाईने शिकवत आहेत. आजच्या काळात मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे आणि त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सक्षम असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हीच बाब केंद्रस्थानी ठेवून शाळेत हे विशेष प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. कराटे प्रशिक्षणासोबतच विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट शारीरिक तंदुरुस्तीसाठी व मानसिक एकाग्रतेसाठी आठवड्यातून दोन दिवस नियमितपणे योगासनांचे वर्गही घेतले जात आहेत. कराटेच्या या माध्यमातून मुलींमध्ये निर्भयता व आत्मरक्षणाची क्षमता विकसित होत आहे, तर योगासनांमुळे अभ्यासातील एकाग्रता आणि शारीरिक ऊर्जा वाढण्यास मोठी मदत होत आहे. शाळेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून पालकवर्गातूनही या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. लाडसावंगी येथे विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *