Headlines

सर्वोपचार रुग्णालयाला मिळाले बॅटरीवर चालणारे स्ट्रेचर वाहन:रुग्णांना दिलासा, सीएसआर निधीतून मदतीसाठी पुढाकार




शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांची अंतर्गत वाहतूक अधिक सुलभ, जलद, सुरक्षित करण्यासाठी बसंत अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून बॅटरीवर चालणारे आधुनिक स्ट्रेचर वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधेमुळे रुग्णालयातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेला बळ मिळणार आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे. सर्वोपचार रुग्णालयाचा परिसर मोठा असल्याने रुग्णांना एका वॉर्डमधून दुसऱ्या विभागात तसेच एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, इतर तपासण्यांसाठी लांब अंतरापर्यंत न्यावे लागते. विशेषतः वयोवृद्ध, अशक्त, दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त, शस्त्रक्रियेनंतर हालचाल करण्यास अडचण असलेल्या रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा रुग्णांना स्ट्रेचर किंवा व्हीलचेअरवरून नेण्यासाठी नातेवाईकांसह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना कमी स्ट्रेचरमुळे धावपळ करावी लागत होती.यावेळी उपअधिष्ठाता डॉ. दिनेश नैताम, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरविंद आडे, स्त्रीरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. शामकुमार सिरसाम, प्रशासकीय अधिकारी महेश महाकालीवार, मेट्रन ग्रेसी ऑगस्टीन, स्वच्छता निरीक्षक हेमंत इंगळे, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सरदार यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन समाजसेवा अधीक्षक तथा सीएसआर समन्वयक अमोल शेंडे यांनी केले. यावेळी समाजसेवा अधीक्षक विनायक साखरे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते अमित मिटकरी, शिवा भागवत, सागर थुटे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *