![]()
नगरपरिषदेतील पाच अपक्ष नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
.
या प्रवेशामुळे शिंदेसेनेचे संघटनात्मक बळ वाढले आहे. नगरपालिकेत आता एकूण ७ नगरसेवक झाल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. सध्या नगराध्यक्ष भाजपचा आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शिवा मोहोद यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. नगरपालिकेच्या राजकारणात पाच नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदलाची चर्चा सुरू झाली आहे.
आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. नगरपरिषदेतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये संदीप सरनाईक, सारिता पाटील, पूनम मोडक, ममता महाजन, शुभांगी सरनाईक यांचा समावेश आहे. या पाचही नगरसेवकांनी समर्थकांसह शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले.
राजकीय वर्तुळात लक्ष, राजकारणात नवी घडामोड नगरसेवकांचा पक्षप्रवेश ही केवळ संख्यात्मक वाढ नाही. कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे महत्त्वाचे ठरेल. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, यांकडे लक्ष राहणार आहे. पाच नगरसेवकांच्या प्रवेशामुळे येथील राजकारणात नवी घडामोड घडली आहे. आगामी काळात इतर पक्षांतील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.