Headlines

‘व्यसनमुक्त युवक, सशक्त समाज’; विद्यार्थ्यांचा नशामुक्तीचा संकल्प:शिवाजी नगर स्थित मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात जनजागृतीपर व्याख्यान,



सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयाद्वारे ‘नशामुक्त भारत अभियान’ची विशेष मोहीम राबवली. या वेळी सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी नशामुक्तीचा संकल्प केला. शिवाजी नगर स्थित मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्य

.

युवक व विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, व्यसनांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक परिणाम याबाबत जागृती निर्माण करून व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्यशील कांबळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. स्मीता देशमुख, प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, बार्टीच्या प्रकल्प संचालक अनिता गवई, समाज कल्याण निरीक्षक रवींद्र महालकर आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत यांनी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट केले. व्यसनांच्या आहारी जाण्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, वाईट सवयींपासून दूर राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि व्यसनमुक्त जीवनशैली कशी अंगीकारावी, याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता देशमुख यांनीही व्यसन हे व्यक्तीच्या भविष्याला बाधा आणणारे असून विद्यार्थ्यांनी अशा व्यसनांपासून कायम दूर राहावे. तसेच आपल्या मित्रपरिवारात आणि समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन केले. समाज कल्याण निरीक्षक रवींद्र महालकर यांनी व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशील कांबळे यांनी व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि सामाजिक जीवनावर होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती दिली. व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्यासोबतच इतरांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी केले. बार्टीच्या प्रकल्प संचालक अनिता गवई यांनी ‘नशामुक्त भारत, नशामुक्त शहर आणि नशामुक्त परिवार’ या संकल्पनेतून व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व विशद केले. नशामुक्त समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर जबाबदारी स्वीकारून जनजागृतीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमादरम्य ान उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भारताला नशामुक्त बनविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची सामूहिक शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतः व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच इतरांनाही व्यसनांपासून परावृत्त करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाला वरिष्ठ लिपिक अंकुश सूर्यवंशी, समतादूत पूजा गौतम, भावना वासनिक यांच्यासह विद्यार्थी व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. अनिता गवई यांनी उपस्थितांचे आभार मानले. नशामुक्त भारत अभियानाचा संदेश युवकांपर्यंत पोहोचवत कार्यक्रमाची सांगता झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *