![]()
दीडशे वर्षांपूर्वी विशाल समाज व्यवस्थेच्या विरोधात फुले यांनी काम केले नसते तर आज बुलेट चालवताना किंवा थार चालवताना महिला दिसली नसती. स्त्रियांना माणूस म्हणून जगता यावं इतका मूलभूत काम महात्मा फुले यांनी केलेले आहे आणि म्हणूनच महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे नाव अभिमानाने मिरवावे, असेच नाव आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि आंबेडकरांनी त्याकाळी महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी काम केले. आणि म्हणूनच आज स्त्री मुक्तपणे श्वास घेऊ शकते. दोनशे वर्षांपूर्वी बलाढ्य विषमतावादी व्यवस्थेला हादरे देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले, असे प्रतिपादन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले. ते मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राचार्य नरेश बदनोरे होते. सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूर व महात्मा ज्योतिबा फुले जन्म द्विशताब्दी समितीच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेळी प्रा. एम. आर. कांबळे, अॅड. शंकर पाटील, प्रा. डॉ. संजय गायकवाड, सरफराज अहमद, आशितोष नाटकर, सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संस्थेचे विश्वस्त नागेश बिराजदार, विश्वस्त अश्विनी कोळी आदी उपस्थित होते. संस्थेचे सचिव एम. डी. कमळे म्हणाले, महात्मा गांधी, साने गुरूजी आणि महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कमळे गुरूजी यांनी संस्थेचे रोपटे लावले. ते आज विस्तारले आहे. प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांनी स्वागतपर मनोगत यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात अॅड. मनीष गडदे यांनी महात्मा फुले जन्मसताब्दी वर्षातील कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. समन्वयक प्रा. डॉ. जवाहर मोरे यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक प्रा. डॉ. भगवान आदटराव यांनी आभार मानले. या स्पर्धक विद्यार्थ्यांनी पटकावली बक्षिसे प्रथम-किरण सुरवसे-एन. बी. नवले, सिंहगड कॉलेज केगाव.द्वितीय-सुजाता बंडगर-असेंट कॉलेज कंदलगाव, तृतीय-अथर्व देशपांडे-बी.पी. सुलाखे कॉलेज, बार्शी, उत्तेजनार्थ- जयमाला गायकवाड, संतोष भीमराव पाटील महाविद्यालय, मंद्रूप, सतीश लोखंडे-संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर, आदित्य नागणे-एन. बी. नवले सिंहगड कॉलेज केंगाव. स्पर्धेचे परीक्षण डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. अस्मिता बालगावकर आणि डॉ. ममता बोल्ली यांनी केले.
Source link
महात्मा फुले यांनी दोनशे वर्षांपूर्वीविषमतावादी व्यवस्थेला हादरे दिले:मंद्रूपमध्ये स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी डॉ. केदारनाथ काळवणे यांचे प्रतिपादन