![]()
एका दाण्याचे हजार दाणे तयार करण्याची ताकद केवळ माझ्या शेतकरी बापाच्या मनगटात आहे. ही ताकद अन्य कोणातही नाही. शेतकऱ्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या विचारांनुसार समाजाने शासनाने वाटचाल करणे आवश्यक आहे. ‘जब देखूं मैं किसानों की भलाई, मैंने खुशिया मनाई’ या संदेशाची आठवण करून देत पक्ष व धर्मभेद बाजूला सारून ‘पहिले शेतकरी जगवा’ असे परखड आवाहन समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी गुरुकुंजातून केले. गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित पालखी व पदयात्रा शिबिराचा विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी समारोप झाला. समारोपीय सत्रात सत्यपाल महाराज आणि त्यांच्या पाल मंडळींनी सप्तखंजेरीच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. यावेळी सत्यपाल महाराजांनी दुष्काळाच्या गंभीर प्रश्नाला हात घातला. त्यांनी उपस्थितांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. ग्रामविकासाचा पाया असलेली ग्रामसभा ही गावाच्या परिवर्तनाची सर्वांत मोठी ताकद आहे. मात्र, आज ग्रामसभेच्या महत्त्वालाच फाटा दिला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्थानिक परिस्थितीची उदाहरणे व पुरावे मांडत त्यांनी व्यवस्थेतील त्रुटींवरही लक्ष वेधले. कार्यक्रमात भाऊसाहेब धुर्वे यांच्यासह विविध प्रबोधनकार मंडळींनी सप्तखंजेरीच्या माध्यमातून संत-महती, ग्रामीण जीवन व समकालीन घडामोडींवर कीर्तन सादर केले. संपूर्ण भारतातून गुरुदेव भक्तांनी गुरुकुंजात उपस्थिती लावली होती. परिसरात विविध वस्तू तसेच भजन मंडळांच्या साहित्याचे स्टॉलही उभारण्यात आले होते. राष्ट्रवंदनेने या प्रबोधनमय सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाला डॉ. पवन वंदे, तुषार सूर्यवंशी, पंकजपाल राठोड, कमलचाळे गोंड, पवनपाल फडके, आकाश टाले, ऋषिकेश राऊत, उदयपाल, श्रीकृष्ण आनासाने, आकाश तावडे, प्रज्वल वानखडे, मोहनदास चोरे, दीपक भोंडकर, राजा धुमनर, क्रांती काळे, तुलसी हिवरे, वेदांती मुकेकर, जान्हवी घुमे, भाविका खडकोळे, सचिन काळे, विजय नागपुरे, शरद घेऊ, विकास भिडे, अनिल कडे, दीपक नरताम, प्रज्वल होगे, शिवानंद पाल तायवाडे, रोशन खाडे, प्रदीपपाल चौधरी, अनिल खामणकर, रवी इंगोले, विवेक कुरमकर, भरत राठोड व इतर मान्यवर उपस्थित होते. गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित पालखी व पदयात्रा शिबिराचा विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी समारोप झाला. समारोपीय सत्रात सत्यपाल महाराज आणि त्यांच्या पाल मंडळींनी सप्तखंजेरीच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. यावेळी सत्यपाल महाराजांनी दुष्काळाच्या गंभीर प्रश्नाला हात घातला. त्यांनी उपस्थितांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. ग्रामविकासाचा पाया असलेली ग्रामसभा ही गावाच्या परिवर्तनाची सर्वांत मोठी ताकद आहे. मात्र, आज ग्रामसभेच्या महत्त्वालाच फाटा दिला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्थानिक परिस्थितीची उदाहरणे व पुरावे मांडत त्यांनी व्यवस्थेतील त्रुटींवरही लक्ष वेधले. राष्ट्रसंतांमुळे पुरस्काराला प्रतिष्ठा प्राप्त होईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करताना सत्यपाल महाराज म्हणाले की, राष्ट्रसंतांना भारतरत्न पुरस्काराची गरज नाही. त्यांच्या कार्यामुळे त्या पुरस्कारालाच प्रतिष्ठा प्राप्त होईल. अशा महान संतासाठी गुरुदेव भक्तांना आंदोलन करण्याची वेळ येणे ही खेदाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Source link
सत्यपाल महाराजांचे परखड प्रबोधन:केवळ शेतकऱ्यांच्याच मनगटामध्ये हजार दाणे निर्माण करण्याची ताकद, तुकडोजी महाराजांचा पालखी महोत्सव