Headlines

श्री शिवाजी कला महाविद्यालयात इंग्रजी विभागाद्वारे नेट-सेट परीक्षांवर कार्यशाळा:प्रा. आकाश हराळ यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती




श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथील इंग्रजी विभागाच्या वतीने नेट-सेट परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली मानव्य विद्याशाखा प्रमुख डॉ. नाना वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत प्रमुख वक्ते प्रा. आकाश हराळ यांनी विद्यार्थ्यांना नेट-सेट परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, अभ्यासाचे नियोजन, परीक्षेच्या तयारीच्या प्रभावी पद्धती याबाबत मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषा व साहित्य विषयाचा अभ्यास करताना साहित्याचा इतिहास, प्रमुख साहित्यिक, साहित्यसिद्धांत, समीक्षा, भाषाविज्ञान या घटकांवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव, संदर्भग्रंथांचा वापर, वेळेचे योग्य व्यवस्थापन यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. सदर कार्यशाळेला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला मराठी विभागप्रमुख डॉ. संजय पोहरे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. राहुल सुडके उपस्थित होते. प्रा. प्राजक्ता सवाई यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून देत कार्यक्रमाची भूमिका मांडली. सूत्रसंचालन प्रा. निशा देशमुख यांनी केले. आभार प्रा. ऋतुजा मुरेकर यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी इंग्रजी विभागातील सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *