Headlines

काँग्रेसने बोगस संसद भरवली:आता आम्ही जनतेच्या संसदेत त्यांची पोलखोल करू, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात




विरोधी पक्षांनी आणि विशेषतः काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘प्रतिसंसदेवर’ भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे. “काँग्रेसने बोगस संसद भरवली असून, आता आम्ही जनतेच्या संसदेमध्ये जाऊन काँग्रेसची पोलखोल करू,” असा थेट इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच, काँग्रेसला बोगस मतदान करून निवडून येण्याची सवय असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. ‘काँग्रेसच्या स्वभावाला कीड लागलीय’ काँग्रेसवर बोगस मतदानाचा आरोप करताना बावनकुळे म्हणाले, “यांना बोगस मतदान करून निवडून यायची सवय आहे, ही काँग्रेस पार्टीची पद्धत आहे. त्यांच्या स्वभावालाच कीड लागलेली आहे.” निवडणुकांमध्ये काँग्रेस गैरप्रकार करत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. ‘आता मतदारयादी अचूक येणार’ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी मतदारयाद्यांमधील पारदर्शकतेवर भर दिला. “आता येणारी मतदारयादी ही पूर्णपणे अचूक येणार आहे. त्यामुळे राज्यात १०० टक्के मतदान झाले पाहिजे, यावर आमचा भर राहील,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ‘जनतेच्या संसदेत जाऊन पोलखोल करणार’ विरोधकांनी भरवलेल्या प्रतिसंसदेवर बावनकुळे म्हणाले, “जशी काल त्यांनी बोगस संसद किंवा प्रतिसंसद भरवली, तसे आम्ही आता त्यांना जनतेच्या संसदेमध्ये उत्तर देऊ. आम्ही थेट जनतेमध्ये जाऊन त्यांना खरी परिस्थिती काय आहे, हे सांगू. काँग्रेसचा खोटेपणा उघड करण्यासाठीच आम्ही आता हे आयोजन केले आहे.” —————— हेही वाचा.. भाजपचा दावा- राहुल आणि प्रियंकांत मतभेद:INDIA ब्लॉकच्या रॅलीत राहुल यांनी बहिणीला बोलू दिले नाही; 8 नेत्यांनी केली होती भाषणे
भाजपने रविवारी आरोप केला की, काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. यामागे राहुल व प्रियंका गांधी यांच्यातील मतभेद आहेत. भाजपचे खासदार आणि प्रवक्त्यांनी आरोप केला की, राहुल गांधी यांनी आपल्या बहिणीला म्हणजे प्रियंका यांना INDIA ब्लॉकच्या दोन आंदोलनांमध्ये बोलू दिले नाही. त्यांनी म्हटले की, प्रियंकांना पुढे आणल्यास आपण स्वतः मागे पडू, अशी राहुल गांधींना भीती आहे. INDIA आघाडीने शनिवारी CEC ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मॉक संसद आयोजित केली होती. त्यानंतर रविवारी याच मुद्द्यावर दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली आयोजित करण्यात आली होती. प्रियंकांनी दोन्ही प्रसंगी भाषण केले नाही. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *