![]()
वरणगावजवळील फुलगाव उड्डाणपुलाखालील बायपास रस्त्यावर एका 28 वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आल्याची गंभीर घटना रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सरफराज सैय्यद बशीर सैय्यद (वय 28, रा. मुक्ताईनगर) असे या घटनेतील जखमी तरुणाचे नाव आहे. काम आटोपून सरफराज दुचाकीने मुक्ताईनगर येथील आपल्या घरी जात होता. सरफराज हा भुसावळ येथील बी. एन. अग्रवाल यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करतो. दरम्यान, त्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यानंतर तो नेहमीच्या उड्डाणपुलावरील मार्गाने न जाता पुलाखालील बायपास रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला अडवले. या हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले आणि त्यानंतर त्याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. दोन गोळ्या लागल्या या हल्ल्यात एक गोळी त्याच्या डाव्या खांद्याला चाटून गेली, तर दुसरी गोळी पोटात अडकली. गंभीर जखमी झालेला सरफराज रस्त्यावर कोसळताच तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकृती धोक्याबाहेर स्थानिकांनी जखमी सरफराजला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्याला जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. फरार तिन्ही अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सोशल मीडियाच्या मैत्रिणीच्या बोलावण्यावरून तिथे गेला मिळालेल्या माहितीनुसार, सरफराजची महिनाभरापूर्वी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका मुलीशी ओळख झाली होती आणि त्यांच्यात नियमित बोलणे सुरू होते. रविवारी संबंधित मुलीने बोलावल्यामुळेच तो त्या मार्गाने जात होता. मात्र, ते सोशल मीडिया अकाउंट बनावट असून ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलीचा आवाज तयार करून सरफराजशी संवाद साधला जात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. हे ही वृत्त वाचा शालार्थ आयडी घोटाळा:2012 ते 2016 दरम्यान दीड हजारबोगस आयडीद्वारे 100 कोटींचा अपहार, एसआयटीच्या तपासात बाब उघड
राज्यात क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे. आता थेट 2012 ते 2016 च्या कालावधीत सुमारे दीड हजार बोगस शालार्थ आयडी जनरेट करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार एसआयटीच्या तपासात उघड झाला. या महाघोटाळ्यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर तब्बल 100 कोटींचा दरोडा पडल्याचे निष्पन्न झाले असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात लवकरच स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल 2 गुन्ह्यांत तब्बल 160 कोटींचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यात आणखी 100 कोटींची भर पडल्याने अपहाराचा आकडा तब्बल 260 कोटींच्या वर जाणार आहे. वाचा सविस्तर
Source link
वरणगावजवळ युवकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार अन् रॉडने हल्ला:गोळीबार प्रकरणामागे जुन्या वादाची किनार असण्याची शक्यता