Headlines

बीट्स वर्कची धूम तर ‘किमोरा’साडी 18 हजारांपर्यंत:कापड बाजारात महिलांची गर्दी वाढली; रेडीमेड कॅट्रास्ट हेवी ब्लाउजला पसंती




दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आली असून शहरात सणाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. कापड बाजारात खरेदी हळूहळू वेग घेत असून यंदा महिला वर्गामध्ये ‘बीट्स वर्क’ साडी व रेडीमेड कंट्रास्ट हेवी ब्लाउजची क्रेझ सर्वाधिक पाहायला मिळत आहे. बजेट साड्यांपासून ते अगदी १८ हजार रुपयांपर्यंतच्या ब्रँडेड साड्यांनी अकोल्याची बाजारपेठ सजली आहे. अकोला शहरातील ‘सागर साडीज’चे संचालक सागर अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरतमध्ये विशेष आयात केलेल्या मशीन्सद्वारे हे आधुनिक बीट्स वर्क तयार केले जात आहेत. या डिझाइन्सची हुबेहूब कॉपी करणे कठीण आहे. बाजारात सध्या किमोरा, सिंदूरी, झुला पॅटर्न, टीएचएफ सिंथेटिक आदी ब्रँड्स व व्हरायटीजना महिलांची विशेष पसंती मिळत आहे. आजपासून तेजीची आशा – सागर सारीज या होलसेल दालनाचे संचालक सागर अग्रवाल व सांगलीवाला दालनाचे पंकज शर्मा म्हणाले की, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीला बाजारात काहीशी मंदी जाणवत आहे. मात्र, आता नवीन महिन्यात एक तारखेला कर्मचाऱ्यांचे पगार जमा झाल्यानंतर आणि दिवाळीच्या पुढील १५ दिवसांत खरेदीला तेजी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ३. झूला पॅटर्न : शिफॉन, जॉर्जेट, सिल्क फॅब्रिकवर ग्रीन-येलो कॉम्बीनेशन, फॉइल प्रिंट, बांधनी आदी डिझाइन्स आहेत. ही साडी होलसेलमध्ये १,३०० तर किरकोळमध्ये २ हजारांपर्यंत जाते. १. किमोरा : अत्यंत प्रीमियम आहेत. यात सिल्क, बनारसी सिल्क, टिश्यू सिल्क, जॉर्जेट आदी फॅब्रिकमध्ये उपलब्ध आहेत. यांची होलसेल किंमत ८ हजार अन् रिटेलमध्ये त्या १८ हजारांपर्यंत विकल्या जातात. २. सिंदूरी रासलीला): ही एथनिक वियरमधील सुंदर साड्यांची व्हेरायटी आहे. या लग्न व सण उत्सवांसाठी डिझाइन केलेल्या आहेत. ४. टीएचएफ सिंथेटिक साड्या : या साड्या होलसेलमध्ये ५०० ते ३ हजार रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत. यात आकर्षक बॉर्डर एम्ब्रॉयडरी व पोझिशनल प्रिंट पाहायला मिळते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *