गंगापूजन, मिरवणुकीने कुंभमेळ्याचे ध्वजारोहण:पैठणच्या मोक्षघाटावर मंत्रोच्चार, धार्मिक विधी
पैठणला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा प्रारंभ शनिवारी गंगापूजन, भव्य मिरवणूक आणि धार्मिक विधींनी उत्साहात पार पडला. गोदावरी नदीच्या तीरावरील मोक्षघाट येथे ३१ फुटी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी आमदार विलास भुमरे व त्यांच्या पत्नी वर्षा भुमरे, नगराध्यक्षा विद्या कावसानकर, भूषण कावसानकर, नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, रघुनाथ महाराज पालखीवाले, बळीराम महाराज जोगस तसेच…