Headlines

FASTag Pass, Gas Price Hike & Caller ID Updates

नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक व्यावसायिक सिलिंडर आजपासून 17 रुपयांपर्यंत महागला आहे. आजपासून तुमच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आल्यास क्रमांकासोबत कॉल करणाऱ्याचे खरे नावही दिसेल. टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्या वाहनमालकांना 1 वर्षाचा स्थानिक फास्टॅग पास मिळेल. नोव्हेंबर 2026 मध्ये सिलिंडर, दूरसंचार, वाहतूक आणि गुंतवणुकीशी संबंधित असेच 5 बदल होत आहेत. हे सोप्या भाषेत…

Read Full News

हत्तरसंग कुडलच्या सुशोभीकरणास मिळणार गती:संगमेश्वर देवस्थान व हत्तूर परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान कुडलसंगमचा (दक्षिण सोलापूर) विकास आणि हत्तूर परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामांबाबत सोलापूर जिल्हा परिषदेने विषय सर्वसाधारण सभेपुढे आणला आहे. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी अध्यक्ष दीपक अरुण वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या प्रमुख विकासकामांना अंतिम मंजुरी मिळणार आहे. यासोबतच माध्यमिक शाळेत ग्रंथालय करण्यासाठी प्रस्ताव…

Read Full News

दर जाहीर न केल्याने तोडगा नाही, पंढरपुरातील चारही कारखाने बंद:आंदोलक शेतकऱ्यांच्या गव्हाणीमध्ये उड्या

उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर देण्यात यावा, अशी मागणी ऊस दर संघर्ष समितीने केलेली असली तरी साखर कारखानदार मात्र दर जाहीर करण्यास तयार नाहीत असे दिसते. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही पंढरपूर तालुक्यातील चारही साखर कारखाने बंद होते. ग्रामीण भागातील ऊस तोडणी कार्यक्रम ठप्प झालेला असून, हजारो वाहने साखर कारखान्यावर ऊस घेऊन उभी आहेत. दरम्यान, ऊस…

Read Full News

विद्यार्थ्यांनी घेतला भ्रष्टाचारमुक्त समाजाचा संकल्प:कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयात दक्षता व जनजागृती सप्ताह सुरू

महाराष्ट्र शासनाकडून २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता व जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पदव्युत्तर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या नेतृत्वात पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे दक्षता व जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी…

Read Full News

विद्यार्थी आणि प्राध्यापकांनीही घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (आय.एम.एस.सी.डी.आर.) येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि जबाबदार नागरिकत्वाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेस व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. हातिम कय्यूमी आणि ग्रंथपाल डॉ. स्वाती बार्नबस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

Read Full News

शालेय विद्यार्थ्यांनी तयार केले पर्यावरणपूरक आकाशकंदील:विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील टाकळीमानूर येथील श्री भवानी माता विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला चालना देत विविध आकारांचे, रंगसंगतीचे आणि आकर्षक सजावटीचे आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेल्या आकाशकंदिलांसह सुबकपणे सजविलेल्या पणत्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची कलात्मकता,…

Read Full News

यंदा थंडी कमी पडणार, नोव्हेंबरमध्ये दिवस उष्ण राहणार:अर्नबच्या प्रभावामुळे दिल्ली-पंजाबमध्ये धुके; ओडिशा-आंध्र प्रदेशात पावसाचा इशारा

हवामान विभागाने सांगितले आहे की, यंदा देशात थंडी कमी पडेल. म्हणजेच दिवसाचे तापमान सामान्यापेक्षा जास्त राहील. दुपारी उन्हाचा तडाखा जाणवेल, नोव्हेंबरमधील गुलाबी थंडीचा अनुभव येणार नाही. याउलट रात्री दोन प्रकारची स्थिती राहील. हे सर्व यासाठी होईल कारण प्रशांत महासागराच्या मध्यभागी समुद्राचे पाणी खूपच गरम झाले आहे. IMD च्या मॉडेलनुसार नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत हेच तीव्र अल निनो कायम…

Read Full News

ग्रामीण विकासासाठी पंचायत समितीद्वारे चालना- आ. भुमरे:ढोरकीन परिसरात सिमेंट रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासह गावागावांतील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांना चालना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार विलास भुमरे यांनी केले. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि शैक्षणिक सुविधा ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी असून पंचायत समितीच्या माध्यमातून अशा मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंचायत समितीच्या सभापती वैशाली…

Read Full News

अद्रकाचा लागवड खर्च निघेना:फुलंब्रीमधील शेतकरी संकटात, दुष्काळात पीक जोपासना करूनही पदरी निराशा

मागील दोन वर्षांत अद्रक पिकाच्या जोरावर चांगली कमाई करून मालामाल झालेल्या फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा आणि बाजारपेठेतील तीव्र घसरणीचा मोठा वळवटा आला आहे. एकीकडे तीव्र दुष्काळामुळे विहिरींनी तळ गाठल्याने पिकांना पाणी देणे पूर्णपणे अशक्य झाले आहे, तर दुसरीकडे तुटपुंजे भाव मिळत असल्याने फुलंब्री तालुक्यातील अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. फुलंब्री तालुक्यात…

Read Full News

आंदोलन:जामनेरात बंद सीसीटीव्हींना घातले हार‎, 8 वर्षांपासून कॅमेरे धूळखात असल्याने केला निषेध

शहरात वाढत्या चोऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, नगर परिषदेने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या आठ वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. या निष्क्रिय कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अविनाश बोरसे यांनी शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना चक्क पुष्पहार अर्पण करून अनोखे आंदोलन केले. जामनेर नगर परिषदेने शहराच्या सुरक्षिततेसाठी कोट्यवधी रुपये खर्च…

Read Full News