ग्रामीण विकासासाठी पंचायत समितीद्वारे चालना- आ. भुमरे:ढोरकीन परिसरात सिमेंट रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासह गावागावांतील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांना चालना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार विलास भुमरे यांनी केले. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि शैक्षणिक सुविधा ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी असून पंचायत समितीच्या माध्यमातून अशा मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंचायत समितीच्या सभापती वैशाली…