विद्यार्थ्यांना मिळाले कायद्याचे धडे; न्यायाधीशांना शुभेच्छापत्रांची भेट:सोयगाव जि.प. शाळेत विधी सेवा समितीच्या शिबिराची सांगता
विद्यार्थ्यांना लहान वयातच कायद्याचे ज्ञान व्हावे, त्यांच्यात हक्क आणि कर्तव्यांविषयी जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने सोयगाव येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात विद्यार्थ्यांना बालहक्क, शिक्षणाचा अधिकार, मूलभूत हक्क व कर्तव्ये आणि सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, दिवाळीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी…