![]()
भोकर येथील स्टेट बँकेतून ४ दरोडेखोरांनी शनिवारी १५ लाखांची रोकड आणि ३० किलो सोने (सुमारे ३५ कोटी रुपये) लुटले. या घटनेत दरोडेखोरांनी हेल्मेट घालून बँकेत प्रवेश मिळवल्याची बाब समोर आली आहे. सुरक्षा रक्षक असताना दरोडेखोरांना प्रवेश मिळालाच कसा, तसेच या वेळी बँकेचे सीसीटीव्ही का बंद होते यावरून दरोड्यात बँकेच्या कर्मचाऱ्यांचाही हात असल्याचा संशय बळावला असून माजी पीएसआय याचा मास्टरमाइंड आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकर येथील पोलिस पाटील संभाजी पाटील यांचे सासरे संभाजी पवार यांनी पोलिसांना कळवली. त्यानुसार पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी परिसरातील चारही मार्गांवर ग्रामस्थांच्या मदतीने नाकेबंदी केली आणि अवघ्या दोन तासांत आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केले. बँकेत ३५ कोटींचे सोने आणि रोकड असतानाही सीसीटीव्ही कॅमेरे नेमके आजच कसे बंद होते? सुरक्षा रक्षक दारात असतानाही ४ अनोळखी व्यक्तींना हेल्मेट आणि मास्कसह बँकेत प्रवेश कसा मिळाला? याचाही तपास पोलिसांकडून केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जळगाव कारागृहात रचण्यात आला कट या दरोड्याचा मास्टरमाइंड माजी पीएसआय शंकर जासक आहे. २०२३ मधील कालंकामाता बँक दरोडा प्रकरणात तो जळगाव कारागृहात होता. तिथे त्याची भेट खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजानन पवार याच्याशी झाली. जासक जून २०२५ मध्ये जामिनावर तर पवार ऑगस्ट २०२६ मध्ये पॅरोलवर बाहेर आला. त्यांनी कारागृहातच या दरोड्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
Source link
माजी पीएसआयने रचला बँकेमध्ये दरोड्याचा कट:जळगावमध्ये हेल्मेट घालून बँकेत प्रवेश मिळवला