Headlines

गंगापूजन, मिरवणुकीने कुंभमेळ्याचे ध्वजारोहण:पैठणच्या मोक्षघाटावर मंत्रोच्चार, धार्मिक विधी




पैठणला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा प्रारंभ शनिवारी गंगापूजन, भव्य मिरवणूक आणि धार्मिक विधींनी उत्साहात पार पडला. गोदावरी नदीच्या तीरावरील मोक्षघाट येथे ३१ फुटी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी आमदार विलास भुमरे व त्यांच्या पत्नी वर्षा भुमरे, नगराध्यक्षा विद्या कावसानकर, भूषण कावसानकर, नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, रघुनाथ महाराज पालखीवाले, बळीराम महाराज जोगस तसेच आयोजन समितीचे संयोजक पवन लोहिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कमलाकर शिवपुरी, दत्तागुरू पोहेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रोच्चार आणि धार्मिक विधी पार पाडले. या कार्यक्रमास तहसीलदार ज्योती पवार, डॉ. पल्लवी अंभोरे, महादेव गोमारे, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, बजरंग लिंबोरे, रवींद्र काळे, दादा बारे, दिनेश पारिख, फाजल टेकडी, गौरव आठवले आदी उपस्थित होते. आमदार विलास भुमरे म्हणाले की, नाशिकच्या धर्तीवर पैठणमधील शाही स्नानाचे नियोजन करण्यात येईल. भाविकांसाठी गोदावरीत पाणी सोडण्याबाबत नियोजन केले जाईल. पैठणसाठी विशेष निधी उपलब्ध करून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन प्रयत्न करणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *