Headlines

महिलांची सव्वादोन कोटींची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला अखेर अटक:विंचूरच्या दिव्यज्योत संस्थेच्या माध्यमातून महिलांना गिरणी, वॉशिंग मशीनचे आमिष‎

महिलांना मोफत शिवणकाम व ब्युटीपार्लर प्रशिक्षण देण्यासह शासकीय योजनेंतर्गत शिलाई मशीन आणि १५ हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून हजारो महिलांची सव्वादोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी पती-पत्नीला लासलगाव पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून अटक केली. संजय बोराळे व जयश्री बोराळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नाशिक जिल्ह्यातील विविध…

Read More

कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी टाळ वाजवा आंदाेलन‎:निफाड नगरपंचायतीकडून लवकरच कार्यवाहीचे लेखी आश्वासन; भाजपचे आंदोलन मागे‎

शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी निफाड शहर भाजपच्या वतीने बुधवारी (दि. ३०) नगरपंचायत कार्यालयासमोर टाळ वाजवत आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबतचे निवेदन नगरविकास मंत्री, जिल्हाधिकारी नाशिक, संचालक नगरपालिका प्रशासन, तहसीलदार निफाड, पोलिस निरीक्षक निफाड व मुख्याधिकारी निफाड नगरपंचायत यांना देण्यात आले. शहरात…

Read More

सुरतमध्ये 3 हत्या, पती-पत्नीने 4 वर्षे लपवले रहस्य:सासू, आजी आणि बहिणीची हत्या; एक मृतदेह घरात पुरला, आता सांगाडे सापडले

गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील कोसांबा येथे तीन महिलांच्या हत्येचा 4 वर्षांनंतर उलगडा झाला आहे. अहमदाबाद क्राइम ब्रँच आणि कोसांबा पोलिसांनी वडफलिया येथील एका घराच्या अंगणातून मानवी सांगाडे जप्त केले. पोलिसांच्या माहितीनुसार, माधवदास आणि त्याची पत्नी उर्मिला यांच्यावर तिन्ही महिलांच्या हत्येचा आरोप आहे. मृतांमध्ये उर्मिलाची आजी शांताबेन, बहीण भगवतीबेन आणि माधवदासची आई मंजुलाबेन यांचा समावेश आहे. माधवदासने…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:1110 कोटींचे विमा कवच; 4.25 लाख अर्जांचा हिशेब बांधावर होणार

दुष्काळाचा शिक्का बसला, शिवारातील खरीप हंगाम हातातून गेला असून आता पंचनाम्यांची लगबगही सुरू झाली आहे. मात्र जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार ६५६ विमाधारक शेतकऱ्यांच्या पदरात नेमके किती पैसे पडणार याचे उत्तर अजून बांधावरच दडले आहे. नऊ तालुक्यांत ४ लाख २५ हजार ६१९ विमा अर्जांमधून २ लाख १४ हजार ५३६ हेक्टर क्षेत्राला १११० कोटींचे विमा संरक्षण…

Read More

संतांचे विचार आत्मसात करणे हीच खरी जीवनाची सार्थकता- विद्यानंद महाराज:करंजखेड येथील श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे संकष्टी चतुर्थी साजरी‎

मानवाने संसार थाटामाटात करत असताना मनातील दुर्बुद्धी दूर सारून सद्बुद्धीने सद्वविचारांचे आचरण केले पाहिजे. भगवंताच्या सान्निध्यात राहून संतांचे विचार आत्मसात करणे हीच खरी मानवी जीवनाची सार्थकता आहे, असे प्रतिपादन मुर्डेश्वर देवस्थानचे मठाधिपती बालयोगी विद्यानंद महाराज यांनी केले. करंजखेड येथील गणेश गडावर अंगारक संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर इच्छापूर्ती श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे श्रींचे पूजन व कीर्तन…

Read More

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या:छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मुरुमखेड्याची घटना‎

बँक व खाजगी कर्जाचा वाढता भार, इतर देणी आणि सततच्या नापिकीमुळे त्रस्त झालेल्या तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना लाडसावंगी जिल्हा परिषद गटातील मुरुमखेडा येथे घडली. विजय गोविंदराव बचाटे (३६) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी सोमवारी सायंकाळी हे टोकाचे पाऊल उचलले. विजय बचाटे यांची मुरुमखेडा शिवारात गट नंबर ४०५ मध्ये…

Read More

मंदिरातून 2 लाख 20 हजारांचा मुकुट लंपास:गणेशपूर येथील घटना, पिशोर पोलिसांत गुन्हा‎

गणेशपूर येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश करून गणपती मूर्तीवरील चांदीचे मुकुट लांबवल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. या चोरीत २ लाख २० हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज लंपास झाला आहे. २९ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते ३० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य…

Read More

तपासावर वकिलांचा आक्षेप:घोसाळकर हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर ताशेरे, सीबीआयची एंट्री, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आले चर्चांना उधाण

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने कायदेशीर कारवाई करत न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या पुरवणी आरोपपत्रामुळे या प्रकरणातील गूढ उकलण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच घोसाळकर कुटुंबीयांचे वकील अ‍ॅड. भूषण महाडिक यांनी मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘पोलिसांना अनेक महत्त्वाच्या बाबींची सखोल तपासणी करण्यात पूर्णपणे अपयश आले,’…

Read More

LPG Subsidy, e-KYC & Commercial Cylinder Price Hike

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज 1 ऑक्टोबर 2026 पासून सिलेंडर, बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि सरकारी योजनांशी संबंधित 6 नियम बदलत आहेत. हे सोप्या भाषेत खाली समजावून सांगितले आहे: 1. व्यावसायिक सिलिंडर 70 रुपयांनी महाग बदल: तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 70 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. परिणाम: व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे रेस्टॉरंट मालकांचा खर्च काही…

Read More

संभाजीनगरात 39 वर्षांतील सर्वाधिक 36.9 अंश तापमान:यापूर्वी 26 सप्टेंबर 1987 रोजी 37 अंश होता पारा

महिन्याच्या अखेरच्या दिवशीच सप्टेंबर महिन्यातील रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली. बुधवारी (३० सप्टेंबर) शहराचे कमाल तापमान तब्बल ३६.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले. हे तापमान गेल्या ३९ वर्षांतील सप्टेंबर महिन्यातील सर्वकालीन उच्चांकी तापमान ठरले असून या महिन्यात ३० पैकी २६ दिवस कमाल तापमान तिशीच्या पार होते हे विशेष, तर बुधवारी शहराचे किमान तापमान २२.२ अंश सेल्सियस होते….

Read More