गुजरातला पाणी पिणारे प्रकल्प नकोत म्हणून ते उजनीवर लादणार का?:रोहित पवार शेतकऱ्यांसह रस्त्यावर; म्हणाले- प्रकल्प रद्द न केल्यास महामार्ग बेमुदत बंद करू
उजनी धरणावर प्रस्तावित असलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) डेटा सेंटर आणि ऊर्जा प्रकल्पावरून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळवून उजनीच्या जीवावर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाविरोधात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेते आणि हजारो शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला. “गुजरातला पाणी पिणारे आणि पर्यावरणाचा ऱ्हास…