“देशातील सर्वोच्च न्यायालय असो, निवडणूक आयोग असो वा रिझर्व्ह बँक; ज्या स्वायत्त व वैधानिक संस्थांवर लोकशाहीचा डोलारा उभा आहे, त्या सर्व संस्थांची केंद्र सरकारकडून पद्धतशीरपणे गळचेपी सुरू आहे. लोकशाही संपवून देशात सरळसरळ हुकूमशाही सुरू झाली आहे. मतचोर
.
नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधताना खासदार काळे यांनी केंद्रातील भाजप सरकारचे संस्थांवरील नियंत्रण, रामलीला मैदानावरील महारॅली, आणि महाराष्ट्रातील विधानपरिषद निकालानंतर महायुतीमध्ये उफाळलेल्या अंतर्गत संघर्षावर सडेतोड भाष्य केले.
ज्ञानेश कुमारांविरोधात आज इंडिया आघाडी चालवणार ‘महाभियोग’!
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर बोट ठेवत खासदार कल्याण काळे म्हणाले, “केंद्रीय यंत्रणा आणि एसआयआरच्या माध्यमातून मतांची चोरी केली जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे निष्पक्ष काम न करता थेट भारतीय जनता पक्षाचे हस्तक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.”
स्वायत्त संस्थांची गळचेपी
“जेव्हा देशातील न्यायव्यवस्था, रिझर्व्ह बँक आणि निवडणूक आयोग यांसारख्या वैधानिक संस्थांचे स्वातंत्र्यच हिरावून घेतले जाते, तेव्हा देशात लोकशाही शिल्लक उरत नाही. हे रोखण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज खरगे यांच्या निवासस्थानी विरोधक एकत्र येऊन ज्ञानेश कुमारांविरुद्ध महाभियोग चालवतील.”
आंदोलनात अडथळे आणण्याचा डाव
“काँग्रेसच्या लोकशाही मार्गाने चालणाऱ्या आंदोलनांमध्ये खोडा घालण्यासाठी भाजपकडून विविध संस्थांच्या माध्यमातून मॉक पार्लमेंटसारखे उद्योग केले जात आहेत; मात्र जनतेच्या रेट्यापुढे हे कारस्थान टिकणार नाही.”
उद्या दिल्लीत ऐतिहासिक महारॅली; ही लढाई आता जनतेने हातात घेतली!
उद्या रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनाबाबत माहिती देताना ते म्हणाले, “उद्याच्या महारॅलीसाठी देशभरातून लाखो कार्यकर्ते आणि नागरिक राजधानी दिल्लीत दाखल होत आहेत. आतापर्यंतच्या दिल्लीच्या राजकीय इतिहासात झाली नसेल एवढी प्रचंड आणि अभूतपूर्व गर्दी या रॅलीला पाहायला मिळेल. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही लढाई आता केवळ काँग्रेस किंवा इंडिया आघाडीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर देशातील सामान्य जनतेनेच हा लढा स्वतःच्या हातात घेतला आहे.”
काँग्रेसला 70 वर्षे लागली, यांची 12 वर्षांतच वाटणीसाठी भांडणे सुरू
महाराष्ट्रातील विधानपरिषद निकालानंतर भाजप आणि शिंदे सेनेमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर त्यांनी जोरदार टोला लगावला. “राजकारणात कमी-अधिक प्रमाणात मतभेद सर्वच पक्षांत असतात. काँग्रेस पक्षाला मतभेद व्हायला तब्बल 70 वर्षे लागली; मात्र भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये अवघ्या 12 वर्षांतच उघडपणे अंतर्गत गटबाजी आणि फाटाफूट सुरू झाली. हे दुसरे तिसरे काही नसून केवळ सत्तेच्या मलिद्याच्या आणि मलईच्या वाटणीवरून लागलेले भांडण आहे.”
मविआ एकदिलाने लढली
“महाविकास आघाडीने विधानपरिषदेच्या 5 पैकी 3 जागांवर समन्वयाने काम करत दणदणीत विजय खेचून आणला. आम्ही एकजुटीने काम केले; मात्र महायुतीत कोणी कोणाला पाडले, कोणी कोणाचा गळा कापला यावरून त्यांचा अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.”
सरकार 5 वर्षे पूर्ण करण्यावर शंका
“सत्तेत एकत्र राहूनही मित्रपक्ष एकमेकांचा घात करत आहेत. ज्या पद्धतीने महायुतीमध्ये दररोज नवनवे वाद पेटत आहेत, ते पाहता महाराष्ट्रातील हे सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही, याबाबतच मला गंभीर शंका वाटते,” असा राजकीय बॉम्ब खासदार कल्याण काळे यांनी शेवटी टाकला.
—————————————–
हेही वाचा…
देवेंद्रजींवर बोलताना लायकीत राहा; धंगेकरांना बन यांचा इशारा: म्हणाले- कालपर्यंत व्हिलन वाटणारा विजय मल्ल्या राऊतांना आज महात्मा कसा वाटू लागला?

“पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात जेव्हा तपास यंत्रणांनी अटक केली होती, तेव्हा ‘मी काय विजय मल्ल्या आहे का?’ असा सवाल विचारणारे संजय राऊत आज आपल्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकातून त्याच विजय मल्ल्याला थेट महात्मा ठरवण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत. बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्या मल्ल्यामध्ये आणि मुंबईतील पत्राचाळीत मराठी माणसाची घरे बुडवणाऱ्या संजय राऊतांमध्ये काहीही फरक नाही, दोघांचेही कॅरेक्टर एकच आहे. कालपर्यंत पवार साहेबांची आणि राहुल गांधींची वकिली करणारे राऊत आता विजय मल्ल्यांची वकिली करत आहेत; यासाठी त्यांनी नेमकी कोणती डील केली आहे? या पुस्तकाचे नाव ‘बोध कीर्तन’ ठेवण्यापेक्षा ‘बाळबोध नर्तन’ ठेवले असते तर ते अधिक शोभून दिसले असते,” असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी