Headlines

अनिल सोले यांची बंडखोरी शमली:मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, सुधाकर कोहळेंच्या विजयासाठी करणार काम

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भाजपमध्ये निर्माण झालेला अंतर्गत संघर्ष अखेर मिटला आहे. बंडखोरीची भूमिका घेत अपक्ष उमेदवारी दाखल करणारे माजी आमदार अनिल सोले यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मध्यस्थी आणि पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचे दिलेले आश्वासन यामुळे सोले यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश…

Read More

लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा:जलव्यवस्थापनासह अन्नसुरक्षा, चारा नियोजनावर भर

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागातून शाश्वत उपाययोजना राबविणे, नैसर्गिक संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन करणे आणि स्थानिक गरजांनुसार दुष्काळ निवारणाचा कृती आराखडा तयार करणे, या उद्देशाने स्वयम् शिक्षण प्रयोग (SSP) संस्था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाशी संबंधित परभणी कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘लोकसहभागातून दुष्काळावर मात…

Read More

प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांचा सहसंचालक कार्यालयाला घेराव:अमरावतीत दोन तास ठिय्या आंदोलन, शासनाला निवेदन सादर

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने अमरावतीत उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला घेराव घातला. प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. सहसंचालक डॉ. अभय खांबोरकर यांना शासनाच्या नावाने निवेदन देण्यात आले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील प्राध्यापक यात सहभागी होते. शिक्षक पदांचे संरक्षण, तातडीची पदभरती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कार्यभार…

Read More

मोर्शीत शेतकऱ्याच्या गाडीच्या डिक्कीतून 2 लाख चोरी:बँकेतून काढलेले पैसे परतफेड करण्यासाठी जात असताना घटना, सीसीटीव्हीमध्ये 3 चोरटे कैद

मोर्शी येथे एका शेतकऱ्याच्या गाडीच्या डिक्कीतून २ लाख रुपये चोरीला गेल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी ११.४५ वाजता पुनर्वसन कॉलनी परिसरात ही चोरी झाली. भाईपूर येथील सारंग पुरुषोत्तम खरापकर या शेतकऱ्याने पेरणीसाठी घेतलेले उसनवारीचे पैसे परत करण्यासाठी हे २ लाख रुपये बँकेतून काढले होते. त्यांचे वडील पुरुषोत्तम यांनी मोर्शी येथील भारतीय स्टेट बँकेतून पैसे काढले आणि…

Read More

पत्रकारांवरील हल्ले, ट्रोलिंगप्रकरणी कठोर कारवाई करा:विविध पत्रकार संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पत्रकारांवरील हल्ले, धमकावणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना लक्ष्य करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला झालेली मारहाण तसेच वृत्तवाहिनीच्या संपादिका वृषाली कदम यांना सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ट्रोलिंगप्रकरणी पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले….

Read More

प्रायमाव्हर्सने 'ऑपव्याप' एआय प्लॅटफॉर्म विकसित केला:संस्थांच्या प्रकल्प, उत्पादकता आणि आर्थिक कामगिरीचे रिअल-टाइम निरीक्षण शक्य

संस्थांच्या प्रकल्पांचे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांची उत्पादकता, संसाधनांचा वापर आणि आर्थिक कामगिरी यांचे एकाच ठिकाणी रिअल-टाइम निरीक्षण करता यावे, यासाठी पुण्यातील प्रायमाव्हर्स संस्थेने ‘ऑपव्याप’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित क्लाऊड प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. खासगी, सरकारी, निमसरकारी आणि सेवाभावी संस्थांना त्यांच्या कामकाजाची सद्यस्थिती आणि आर्थिक स्थितीची माहिती एकाच प्रणालीत उपलब्ध करून देणे, हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे….

Read More

एमपीएससीच्या कारभाराची सखोल चौकशी होणार:अध्यक्षांपासून सुरक्षा रक्षकांपर्यंत सर्वांची चौकशी, आमदार रोहित पवार यांचा दावा

सरकारकडून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न होत असतानाही ‘गनिमी काव्या’चा वापर करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात यश मिळवले, असा दावा आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय घेणे भाग पडले असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) गैरप्रकारांची अध्यक्षांपासून सुरक्षा रक्षकांपर्यंत सर्व स्तरांवर चौकशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पवार…

Read More

दुष्काळ भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका:अन्यथा महाविद्यालयांवर कारवाई, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विद्यापीठ प्रशासनाला निर्देश

राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी केले आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. यावेळी…

Read More

मराठवाड्यातील 2.06 लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या यादीत कर्जमुक्ती:नांदेड जिल्हयातील 51 हजार शेतकऱ्यांचा समावेश

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये शासनाने सोमवारी ता. १२ कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहिर केली आहे. यामध्ये मराठवाडयातील २.०६ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये नांदेड जिल्हयातील सर्वात जास्त ५१ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर सर्वात कमी ५ हजार लातुर जिल्हयातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. आता या शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात…

Read More

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा:हत्येपूर्वीच्या गुप्त बैठकीचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती, सुपारीसाठी मोठी रक्कम दिल्याचा संशय

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या गुन्ह्यामागील नियोजनाचे धागेदोरे समोर येत आहेत. पूर्णेकर यांची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती तपासातून पुढे आली असून, या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे हत्येचा कट नेमका कुठे आणि कसा रचण्यात आला, त्यामध्ये कोणाचा सहभाग होता आणि आरोपींना या गुन्ह्यासाठी…

Read More