Headlines

विद्यापीठ पातळीवर शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद उपक्रम घेणार- कुलगुरू खर्चे:डॉ. खर्चे यांची ग्वाही; शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार‎

प्रत्येक पिकातील समस्यांचे निवारण करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादाचे कार्यक्रम घेण्यात येतील. यामध्ये आपल्या सूचना आम्हाला संशोधनासाठी मोलाच्या ठरतील. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईल अशी ग्वाही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील किड रोग सर्वेक्षण व…

Read More

जायखेडा–ताहाराबाद रस्त्यावरील माती हटविली:सलग तीन दिवस काम बंद पाडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग‎

छत्रपती संभाजीनगर ते अहवा राज्य महामार्ग २० वरील जायखेडा–सोमपूर–ताहाराबाद दरम्यानच्या रस्ता कामात निकृष्ट मातीमिश्रित मुरूम वापरला जात असल्याचे उघडकीस आल्याने सोमपूर ग्रामस्थांनी सलग तीन दिवस काम बंद पाडत ग्रामस्थांनी कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुस्त कारभाराचा निषेध केला. अखेर चौथ्या दिवशी अधिकाऱ्यांनी माती हटवण्याचे आणि ‘प्लॅन एस्टीमेट’ दाखवण्याचे आश्वासनानंतर तोडगा निघाला. कामाची दर्जाहीनता दिसताच माजी…

Read More

दुष्काळी मदत, शेतकऱ्यांना हक्काच्या पट्ट्यांसाठी नांदगाव तहसीलवर मोर्चा:माकपचे तहसीलदारांना निवेदन; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा‎

लोकशाहीचे रक्षण, विद्यार्थ्यांचे हक्क आणि दुष्काळग्रस्त शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याच्या मागणीसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), अखिल भारतीय किसान सभा आणि ‘सिटू’ कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन तहसीलदारांना सादर करत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. नांदगाव तालुक्यातील बिकट दुष्काळसदृश परिस्थितीकडे लक्ष वेधत शेतकऱ्यांना…

Read More

रिधोरा येथील रेणुकामाता मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची होतेय गर्दी:अखंड हरिनाम सप्ताहाचे केले आयोजन; हजारो भाविक दर्शनासाठी येणार‎

फुलंब्री-राजूर रस्त्यावर वसलेल्या रिधोरा येथील प्रसिद्ध श्री रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या उत्सवासाठी रेणुकामाता संस्थान कमिटी, रिधोरा यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन क . रिधोरा येथील श्री रेणुकामाता मंदिर हे छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांसह संपूर्ण मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी…

Read More

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या:फुलंब्री तालुक्यातील धानोरा येथील घटना, पोलिसांत नोंद‎

कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील धानोरा येथील एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. तुळशीराम पुंडलिक साळुंके (रा. धानोरा, ता. फुलंब्री) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तुळशीराम साळुंके यांच्यावर बँक पीक कर्जासह महिला बचत गट आणि खासगी…

Read More

निकालात गोंधळ; बाटूकडून विद्यार्थ्यांना कॅम्पस प्रवेश बंदी:डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे ॲप क्रॅश झाल्याने 4 सेमिस्टरचे निकाल मिळेना

महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणाचा डोलारा सांभाळणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा (बाटू) डिजिटल भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यापीठाअंतर्गत एआयपी ॲप्लिकेशन अचानक क्रॅश झाल्याने तब्बल दोन शैक्षणिक वर्षांतील (२०२२ ते २०२४) चार सेमिस्टर . या निष्काळजीपणामुळे हजारो इंजिनिअरिंग पदवीधरांची मूळ गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रे रखडली असून हाताशी आलेल्या नामांकित कंपन्यांच्या नोकऱ्या गमावण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढवली आहे. अपयश…

Read More

एमपीएससी ‘डिस्क्रिप्टिव्ह’; पुण्याचे 800 कोटींचे कोचिंग मार्केट संकटात:2025 पासून एमपीएससीत वर्णनात्मक पद्धत

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठऐवजी (ऑब्जेक्टिव्ह) वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यातील खासगी क्लासेसचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षा क्लासेस, होस्टेल, मेस आणि स्टेशनरी मिळून वर्षाला सुमारे 750 ते 800 कोटींची उलाढाल होते. मात्र, नवीन पद्धतीमुळे…

Read More

बाळासाठी घरी दूध नव्हतं, पती अचानक बेपत्ता झाले,:कोरोनाने रोजीरोटी उद्धवस्त केली; वाचा संकटाच्या फौजेशी लढणाऱ्या शोभा कांबळे यांची संघर्षगाथा!

संकटं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण संकटांसमोर झुकायचं की त्यांच्याशी दोन हात करायचं, हेच माणसाचं खरं सामर्थ्य ठरवतं…आणि जेव्हा प्रश्न असतो आपल्या संसाराचा, आपल्या लेकरांच्या भविष्याचा, तेव्हा एक स्त्री कोणत्याही संकटाला भिडू शकते. वेळ पडली तर रणरागिणी होते, तर कधी संयमाची ढाल बनून परिस्थितीशी लढते. अशाच जिद्दीची, धैर्याची आणि संघर्षाची कहाणी आहे छत्रपती संभाजीनगरच्या शोभा कांबळे…

Read More

Tukaram Mundhe Continues FDA Role; To Lead MPSC Inquiry Committee

राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि कारवाईच्या धडाक्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अन्नपदार्थांमधील भेसळ, निकृष्ट दर्जाची औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांविरोधात त्यांनी कारवा . मुंढेंच्या पोस्टमुळे बदलीच्या चर्चांना पूर्णविराम MPSC मधील कथित पेपरफुटी आणि इतर अनियमिततेच्या आरोपांमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते….

Read More

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल:सेंट्रल किचनच्या अन्नाची गुणवत्ता तपासणार, 9 सदस्यीय समिती गठीत

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सेंट्रल किचनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर आदिवासी विकास विभागाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. अन्नपुरवठ्याची व्यवस्था, अन्नाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची तपासणी करण्यासाठी शासनाने 9 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला 30 ऑक्टोबरपर्यंत सविस्तर आणि वस्तुनिष्ठ…

Read More