Headlines

मोठा अनर्थ टळला:ठाण्यात भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळले; थरारक VIDEO व्हायरल




सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणारे अनधिकृत आणि बेकायदेशीर राजकीय होर्डिंग्ज नागरिकांच्या जीवावर कसे बेतू शकतात, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार ठाण्यातून समोर आला आहे. येथील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील तीन हात नाका परिसरात पादचारी पुलावर लावण्यात आलेला एक राजकीय बॅनर थेट चालत्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला. सुदैवाने या थरारक घटनेत दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नेमकी घटना काय घडली? ठाण्यातील वर्दळीचा रस्ता असलेल्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील तीन हात नाका परिसरात एका पादचारी पुलावर वाढदिवसाचे मोठे राजकीय बॅनर लावण्यात आले होते. महामार्गावरून वाहनांची ये-जा सुरू असताना अचानक हा भलामोठा बॅनर पुलावरून निखळला आणि थेट खालून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या अंगावर पडला. बॅनर अंगावर पडताच दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटण्याची शक्यता होती, मात्र सुदैवाने त्याने प्रसंगावधान राखले आणि गाडी सावरली. सुदैवाने या प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही व मोठा अनर्थ टळला. व्हिडिओ व्हायरल अन् प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती या संपूर्ण घटनेचा थरार एका कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नागरिक उद्विग्न झाले आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, या वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या फुट ओव्हर ब्रिजवर अशा प्रकारचे मोठे आणि धोकादायक बॅनर लावण्यास कोणी व कशी परवानगी दिली? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. नागरिकांची प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी या घटनेनंतर ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक रस्ते आणि पूल हे नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आहेत, नेत्यांच्या जाहिराती आणि राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी नाहीत, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे. कठोर कारवाईची मागणी: बेकायदेशीर बॅनर लावून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी. प्रशासनाला आवाहन: भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने पावले उचलून शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्स हटवावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हेही वाचा.. पंढरपूरच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना:जेजुरीजवळ दिंडीतील ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढवला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *