Headlines

महाराष्ट्रातील दुष्काळ समस्येवर पुण्यात राज्यस्तरीय बैठक:एस एम जोशी फाउंडेशनने 21ऑक्टोबरला बोलावली, पुढील दिशा ठरणार




महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा दीर्घ खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर झाली आहे. खरीप पिकांचे नुकसान पाणी व चाऱ्याची टंचाई शेतमजूरांचा रोजगार स्थलांतर आणि एकल महिला व वंचित कुटुंबावरील वाढता ताण या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. एस एम जोशी फाउंडेशन आणि मूळचे मराठवाड्यातील असलेले , मात्र सध्या पुण्यात राहणारे रहिवासी यांच्या वतीने ही बैठक आयोजित केली जात आहे. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळात एस.एम. जोशी फाउंडेशन नवी पेठ ,पुणे येथे ही बैठक होणार आहे.साथी सुभाष लोमटे ,ललित बाबर ,सुभाष वारे ,सुजाता भिंगाडे ,राजकुमार धुरगुडे – इत्यादी मान्यवर सहभागी होणार आहेत. यापूर्वी दि 22 सप्टेंबर 2026 रोजी राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक झाली होती. त्यात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील 53 कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्या बैठकीतील निर्णयानुसार विभागनिहाय माहितीच्या आधारे दुष्काळ निवारण व तीव्रता कमी करण्याच्या उद्देशाने तसेच शासन प्रशासनासोबत संवादाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही प्रत्यक्ष बैठक होत आहे. जिल्हा व विभागनिहाय दुष्काळ स्थिती पाऊस पीक नुकसान पाणी चारा रोजगार स्थलांतर याचा आढावा. तातडीच्या मदतीसाठी उपाययोजना. शासनाकडे मांडावयाच्या मागण्या व कृती आराखडा. सामाजिक संस्था व प्रशासन यांच्यातील कायमस्वरूपी समन्वय. राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेचे नियोजन, हे चर्चेचे प्रमुख मुद्दे असतील. या बैठकीस आपापल्या जिल्ह्यातील व परिसरातील प्रत्यक्ष माहिती व अनुभव सोबत घेऊन यावे. दूरध्वनी वरून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उपेंद्र टण्णू मोबाईल 9881701881 यांना कळवावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *