Headlines

दहा गुन्हेगारांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार:बिबवेवाडी, आंबेगाव, भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई, पोलीस उपायुक्तांचे आदेश




बिबवेवाडी, आंबेगाव, भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजविणाऱ्या दहा सराइतांना पुणे शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले. तडीपार करण्यात आलेल्या सराइतांविरुद्ध मारहाण, दहशत माजविणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणी मागणे, लूट, मालमत्तेचे नुकसान करणे, धमकाविण्यासह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सराइतांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी मंजुरी दिली. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश ऊर्फ बटन प्रकाश बांदिलकर (वय २०, रा. कात्रज), रामेश्वर लक्ष्मण करे, (वय २५, रा. अंजनीनगर, कात्रज), गणेश तमाराम जाधव (वय २३, रा. कात्रज), आदित्य ऊर्फ सोन्या खंडू कांबळे (वय २३, रा. आंबेगाव खुर्द) यांना शहरातून तडीपार करण्यात आले. बिबवेवाडी परिसरातील अनिकेत विजय कोंढरे (वय २२ रा. बिबवेवाडी) याला तडीपार करण्यात आले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरण दत्तात्रय पांगारे (वय २३, रा. धनकवडी), विकास अनिल जाधव (वय २८, रा. गुजरवाडी, कात्रज), विवेक रमेश शेवाळे (वय २४, रा. कात्रज), गणेश ऊर्फ चिराग सचिन बडगुजर (वय २२, रा. भारतनगर, कात्रज), ओंकार अनंत बहिरट (वय २३, रा. गुजरवाडी रा. कात्रज) यांना तडीपार करण्यात आले. केले आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई कण्यात आली. यापुढील काळात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *