Headlines

पुणे नवरात्रौ महोत्सवात 'लता युग' कार्यक्रमात रसिकांनी गाण्यांना दिली दाद:संदीप पंचवाटकर यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी 'वन्स मोर'ची मागणी केली




३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात ९ व्या दिवशी ‘लता युग’ या कार्यक्रमांमधील भारतरत्न स्वरस्वामिनी लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीते ऐकताना रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले. श्री गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे सायंकाळी निर्माता,दिग्दर्शक आणि निवेदक संदीप पंचवाटकर यांनी सादर केलेल्या ‘लता युग’ या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.लता मंगेशकरांनी विविध संगीतकारांकडे असंख्य गाणी गायली ती अजरामर झाली. त्यातील संगीतकार शंकर जयकिशन, लक्ष्मिकांत प्यारेलाल, आर.डी.बर्मन, जतीन ललित, वसंतदेव, रोशन,पं.हृदयनाथ मंगेशकर अशा असंख संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या रचना आपल्या दैवी आवाजाने अजरामर करणाऱ्या लता दीदींच्या सादर झालेल्या प्रत्येक गीताला वन्स मोर मिळत राहिला. गुलजार, हसरत जयपुरी, शैलेंद्र, आनंद बक्षी, इंदीवर, प्रदीप, सुरेश भट, राजा महेंदी, असद भोपाली अशा गीतकारांच्या या रचना मंत्रमुग्ध करत गेल्या. नाम गुम जायेगा, आजा आई बहार, सोला बरस की, मेघा रे मेघा, रात का समा, फुल तुम्हे भेजा है, तुझसे नाराज नही, तुझे देखा तो ये जाना, बाहो मे चले आओ, मेहंदीच्या पानावर, परबत के उस पार, लग जा गले, छोटीसी उमर मे, सलामे इश्क, दिल दिवाना बिन सजना के, मन क्यू बहका, इस मोड से जाते, होटो पे ऐसी बात अशा असंख्य गाण्यांना टाळ्यांच्या कडकडात प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.काही गाण्यांना वन्स मोर ही मिळाला. प्रत्येक गाण्यांबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन करणाऱ्या संदीप पंचावटकर यांच्या रसाळ निवेदनाने प्रेक्षक तृप्त होत होते. कार्यक्रमच्या अखेरीस लता दिदीनी अजरामर केलेले कवी प्रदीप यांचे ‘ए मेरे वतन के लोगो सादर झाले. तेव्हा सारे प्रेक्षक आदराने उभे राहिले होते. या शेवटच्या गीताने साऱ्यांचेच मन हेलावून गेले होते. प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील व प्रतिभा पाटील व उयोगपती चांडक यांच्या हस्ते कलावंतांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात गायिका रेशमी मुखर्जी, भाग्यश्री डुंभरे, अनुश्री घोरपडे, सहगायक गफार मोमीन, तबला – गोविंद कुडाळकर, ढोलक – नागेश भोसेकर, ऑक्टोप्याड – संजय खाडे, कीबोर्ड – संतोष खंडागळे, संगीत संयोजन कीबोर्ड – सईद खान. या सर्वांचे प्रेक्षकांनी मोठे कौतुक केले. ‘आपण सारे ‘लता युगा’ त जनमलो हे आपल्या भाग्य आहे अशा शब्दात आबा बागुल यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. या प्रसंगी घनश्याम सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, हेमंत बागुल, सागर आरोळे इत्यादी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *