Headlines

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाला मारहाण करून लुटले:बिबवेवाडीत चौघांचा धुडगूस, सोनसाखळी, रोकड आणि मोबाइल हिसकावला




दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण करुन त्याला लुटण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली. या प्रकरणी संदीप उर्फ सँडी चव्हाण, सनी भरगुडे, सनी साळवी, मयूर भोसले (सर्व रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दांडिया कार्यक्रम पाहण्यासाठी दुचाकीवरुन बिबवेवाडीतील पापळ वस्ती परिसरातून निघाला होता. त्यावेळी आरोपींनी तक्रारदार तरुणाला अडवले. सँडी चव्हाण याचा वाढदिवस असून, दारू पिण्यासाठी पैसे दे, अशी धमकी दिली. तरुणाने आरोपींना नकार दिला. त्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण करुन गळ्यातील सोनसाखळी, रोकड, मोबाइल असा मुद्देमाल लुटून नेला. पोलीस उपनिरीक्षक एन भुवड तपास करत आहेत. मद्यधुंद प्रवाशाकडून कॅब चालकाला मारहाण मद्यधुंद प्रवाशाने कॅबचालकाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली. आरोपींनी मोटार पेटवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी दोघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत विनायक लाडप्पा क्षीरसागर (वय २८, रा. उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रवाशासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने एका ॲपवरुन कॅब नोंदणी केली होती. हडपसर येथील अमानोरा टाॅवर परिसरात रविवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास कॅब चालक तेथे आला. आरोपी दारू प्याला होता. ठरलेल्या ठिकाणी कॅब का घेऊन आला नाही? अशी विचारणा करुन आरोपीने कॅब चालकाला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर आरोपीने त्याच्या मित्राला तेथे बाेलावून घेतले. कॅब चालकाला शिवीगाळ करुन मोटार पेटवून देण्याची धमकी देण्यात आली. पोलीस हवालदार एस शिंदे तपास करत आहेत ——— हेही वाचा.. पुणे जिल्ह्यात 25 हजार एकरावर चारा उत्पादन: साडेपाच लाख टन उत्पादनाचे लक्ष्य; सिंचन असलेल्या शेतकऱ्यांना 100 टक्केअनुदानावर बियाणे

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने २५ हजार एकर क्षेत्रावर चारा उत्पादनाचे नियोजन केले आहे. यातून सुमारे साडेपाच लाख टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेला चारा अवघ्या तीन महिन्यांसाठी पुरेल इतकाच असल्याने चारा उत्पादन वाढविण्यासह त्याची साठवण आणि संवर्धन करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. चारा टंचाई जाणवणाऱ्या अन्य जिल्ह्यांनाही गरजेनुसार पुरवठा करण्याचे नियोजन आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *