![]()
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज सर्किट हाऊसवर सर्वपक्षीय बैठक सुरू झाली. दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध करण्यावर या बैठकीत चर्चा होत आहे. उद्या, २१ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. बँकेच्या २१ जागांसाठी २ नोव्हेंबरला मतदान होईल. मागील निवडणुकीत १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या. यंदा दुष्काळ असल्याने ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. यापूर्वी संगमनेर येथील बैठकीनंतर सभापती राम शिंदे आणि डॉ. सुजय विखे यांच्यात मतभेद दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला. खासदार निलेश लंके आणि सदाशिव लोखंडे यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पारनेर आणि श्रीगोंदे तालुक्यात बिनविरोध करण्याचे आव्हान प्रस्थापितांसमोर आहे. बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, सभापती राम शिंदे, खासदार निलेश लंके यांच्यासह सर्वपक्षीय आमदार उपस्थित आहेत. ———- हेही वाचा.. संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करू!: हीच जनतेची इच्छा म्हणत दसऱ्याच्या दिवशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा राजकीय बॉम्ब
“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सामान्य जनतेला आणि प्रत्येक शिवसैनिकाला एकनाथ शिंदे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असेच मनापासून वाटते. मुख्यमंत्रिपदासाठी सभागृहातील संख्याबळ अत्यंत महत्त्वाचे असते. आज आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ थोडे कमी असल्याने एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री पदावर आहेत; मात्र आगामी विधानसभा निवडणुकांत शिवसेनेचे संख्याबळ मोठ्या प्रमाणावर वाढवून शिंदेंना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान करू आणि जनतेची इच्छा पूर्ण करू,” असा मोठा राजकीय बॉम्ब परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टाकला आहे. सविस्तर वाचा
Source link