“संतश्रेष्ठ भगवान बाबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची पावन परंपरा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आयुष्यभर जपली आणि मुंडे साहेबांनंतर हीच परंपरा आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे अत्यंत समर्थपणे पुढे चालवत आहेत. आज ऑक्टोबरच्या या तळपत्या उन्हात
.
पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर आयोजित 12व्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मंत्री मेघना बोर्डीकर, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, ओबीसी आंदोलक ॲड. लक्ष्मण हाके, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
काळ कसोटीचा; दुष्काळात बळीराजाला एकटे सोडणार नाही!
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना धनंजय मुंडे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “बीड जिल्हा हा कष्टकरी, शेतकरी आणि ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. खरिपाची पिके हातची गेली आहेत, रब्बीचा काही पत्ता नाही. अशा स्थितीत शेतमजुरांना काम कसे मिळणार? ऊसतोड मजुरांनी कारखान्यांची उचल घेतली आहे; पण कारखाने किती दिवस चालणार आणि घेतलेली उचल फिटणार कशी, हा मोठा प्रश्न आहे.”
10 महिन्यांची चिंता आणि सरकारचा आधार
“ऑक्टोबर 2026 ते जुलै 2027 या 10 महिन्यांच्या काळात दुष्काळाचा डोंगर समोर उभा ठाकला आहे. मात्र, महायुती सरकारमधील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजाताई आणि आम्ही सर्वजण शेतकरी आणि मजुरांच्या पाठीशी उभे आहोत. दुष्काळात जनतेला दिलासा देण्यासाठी शासन सर्वतोपरी पावले उचलत आहे.”

ऊसतोड मजुरांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरू केली
मुंडे परिवाराने बहुजन आणि वंचित घटकांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचताना ते म्हणाले, “स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्याच्या विकासाची पायाभरणी केली. पंकजाताई मुंडे यांना जेव्हा सत्तेत संधी मिळाली, तेव्हा त्यांनी ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करून मजुरांना हक्क मिळवून दिला.”
शिक्षणासाठी वसतिगृहे
“मला जेव्हा संधी मिळाली, तेव्हा मी संत भगवान बाबा यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात ऊसतोड मजुरांच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे सुरू केली. यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यामध्ये २२ वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. समाज घटकांसाठी काम करण्याची ही खरी तळमळ मुंडे परिवारात आहे.”
कधी ताई तर कधी मी टीकेचा धनी; विरोधकांना नियतीच उत्तर देईल!
राजकीय विरोधकांवर आणि आरोपांवर भाष्य करताना धनंजय मुंडे यांनी संयमाची भूमिका मांडली. “आम्ही लोकांसाठी अविरत काम करत असताना नेहमी टीकेचे धनी ठरतो. कधी ताईंवर टीका होते, तर कधी मला टार्गेट केले जाते. मला अनेक जण म्हणाले की जशाला तसे उत्तर द्या; पण काही वेळा मौन हे शब्दांच्या ताकदीपेक्षा खूप मोठे असते. आपली नियत साफ असली की वक्त आणि नियतीच विरोधकांना उत्तर देत असते.”
राहत इंदोरी यांच्या शायरीतून इशारा
आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी प्रसिद्ध कवी राहत इंदोरी यांचा शेर ऐकवत विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला…
“जलता चिराग मेरा, हवा मचल रही है…कई दिनों से हवा जरा तेज चल रही है! कुछ महफिलें ऐसी बैठी हैं मेरी तबाही के लिए,उन्हें मालूम ही नहीं, हवा रुख बदल रही है!”

भगवान बाबांचा दसरा मेळावा 18 पगड जाती-धर्मांचा संगम!
सामाजिक सलोख्यावर भर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, “भगवान बाबांनी आपल्याला शिकवले आहे की समोरच्याने कितीही द्वेष केला तरी आपण मात्र प्रेमानेच उत्तर द्यायचे. हा दसरा मेळावा कोणत्याही एका विशिष्ट जातीचा, पातीचा किंवा धर्माचा नसून, तो सर्वसामान्य कष्टकरी आणि 18 पगड जाती-धर्मांचा मेळावा आहे. समाजात फूट पाडणाऱ्यांना बाजूला सारून सर्वांनी सामाजिक ऐक्य टिकवून ठेवले पाहिजे.”
——————————————————————————-
हेही वाचा…
500 कोटींचा आरोप सिद्ध करा, नाहीतर षड्यंत्र उघडे पाडा: मनोज जरांगेचं उपमुख्यमंत्री शिंदेंना आव्हान; हेक्टरी 1 लाख, संपूर्ण कर्जमुक्ती घेतल्याशिवाय शांत बसणार नाही!

“मराठा समाजाने आता डोळे उघडून स्वतःच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी एकत्र आले पाहिजे. राजकारण्यांचे पक्ष आणि त्यांचे आमदार-खासदार वाढवण्यासाठी स्वतःचा बळी देणे आधी बंद करा. दुष्काळात शेतकरी हतबल झाला आहे, पिके जळून खाक झाली आहेत आणि सरकार अवघे 5,000 रुपये देऊन बळीराजाची क्रूर चेष्टा करत आहे. या 5,000 रुपयांसाठी शेतकऱ्याचे बँकेच्या फेऱ्या मारण्यात आणि प्रवासातच सर्व पैसे खर्च होणार; मग शेतकऱ्याच्या हातात काय उरणार? राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमुक्ती दिलीच पाहिजे. यासाठी सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून मोठा लढा उभारणार,” असा सज्जड इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी