Headlines

मध्यस्थाला फाटा; थेट शेतमाल विक्रीतून साधले स्वावलंबन:घरासमोरच शेतात पिकवलेला झेंडू तसेच हळदीचे दुकान; ग्राहकांनाही मिळतोय रास्त दरात माल, उत्पन्नात वाढ‎



शेती व्यवसाय म्हटला की वाढता उत्पादन खर्च, निसर्गाची अवकृपा, बाजारातील दरातील अनिश्चितता आणि शेतमाल विक्रीच्या विळख्यात शेतकरी नेहमीच अडकलेला पाहायला मिळतो. मात्र, संकटांवर मात करत जिद्द, योग्य नियोजन आणि स्वतःच्या कष्टावर भर दिला, तर स्वावलंबनाची नव

.

युवराज मिश्रा शेतात झेंडू व हळद पिकाचे नियोजनबद्ध उत्पादन घेतात. केवळ पीक काढून व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता, थेट ग्राहकांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी त्यांनी गवळी पुऱ्यातील घराच्या बाजूला शेतमाल विक्रीचे दालन थाटले आहे. आजच्या काळात शेतकऱ्याने केवळ उत्पादक न राहता स्वतःचा शेतमाल स्वतः विकणारा ‘उद्योजक’ बनणे आवश्यक आहे, हा संदेश त्यांच्या या उपक्रमातून दिला आहे.

बाजारपेठेतील दलाली व कमी दराच्या समस्येला पर्याय म्हणून थेट विक्री हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मार्ग ठरत आहे. स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करत ग्राहकांशी थेट संवाद साधल्यास शेती फायद्यात येऊ शकते, हा आदर्श युवराज मिश्रा यांच्या प्रयत्नांतून अधोरेखित झाला.

स्थानिक बाजारपेठ व थेट विक्रीचा नवा पॅटर्न पारंपरिक शेतीपद्धतीला फाटा देत स्थानिक बाजारपेठेची गरज ओळखून पिकांची निवड करणे आवश्यक आहे. उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर आणि घरासमोरच मांडणी करून थेट ग्राहकांना ताजा व दर्जेदार माल उपलब्ध करून दिल्यास पूरक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात, हे या उपक्रमातून स्पष्ट होते. शेतात दिवसरात्र मेहनत करून भरघोस उत्पादन घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्याची योग्य विक्री करणे आज गरजेचे बनले आहे. मिश्रा यांनी स्वतः विक्रेता बनून शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखवून दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *