Headlines

सण मोठा, नाही आनंदाला तोटा!:वाढत्या दरांतही सोन्याची झळाळी कायम; 'बजेट' आणि 'डिझाइन'वर ग्राहकांचा भर – पी. एन. गाडगीळ अँड सन्स




सध्या सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे या सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खरेदीच्या दृष्टिकोनात लक्षणीय बदल दिसून येत आहे. ग्राहक आता केवळ वजनापेक्षा दागिन्यांचे सौंदर्य, आकर्षक डिझाइन आणि स्वतःचे बजेट यांना अधिक महत्त्व देत आहेत, असे निरीक्षण ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड’ (P. N. Gadgil Sons Ltd.) चे संचालक अमित मोडक यांनी नोंदवले आहे. भारतीय संस्कृतीत दसरा आणि दीपावलीच्या शुभमुहूर्तावर सोन्याची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या काळात सोन्याची खरेदी ही केवळ एक परंपरा नसून, ती भावनिक जिव्हाळ्याची आणि दीर्घकालीन विश्वासाची गुंतवणूक ठरते. या पार्श्वभूमीवर बोलताना अमित मोडक म्हणाले, “सोन्याचे दर वाढले असले तरी ग्राहकांचा सणासुदीच्या खरेदीचा उत्साह कायम आहे. आजचा ग्राहक अधिक सजग झाला असून तो बजेटचा ताळमेळ राखत आधुनिक व पारंपरिक डिझाइन्सना पसंती देत आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांनी आपल्या आवडीचे दागिने निवडताना त्यांना योग्य माहिती, संपूर्ण पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्ह सेवा मिळावी, हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो. ग्राहकांचा वर्षानुवर्षांचा विश्वास आणि प्रेम हीच आमची खरी संपत्ती आहे.” दरम्यान, पी. एन. गाडगीळ अँड सन्सने या सणासुदीसाठी खास बजेट-फ्रेंडली आणि उत्कृष्ट कलाकुसर असलेले विविध दागिन्यांचे कलेक्शन दालनांमध्ये उपलब्ध केले आहे. विजयादशमीच्या या मंगल प्रसंगी सर्व ग्राहकांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, अशा शुभेच्छाही अमित मोडक यांनी दिल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *