Headlines

उद्धव ठाकरेंच्या भाषणात ऑपरेशन टायगर 3 ची भीती स्पष्ट:राम कदम यांचा हल्लाबोल, संजय राऊतांवरही निशाणा




उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावरून भाजप नेते राम कदम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात ‘ऑपरेशन टायगर ३’ची भीती आणि हिंदुत्व सोडल्याची खंत दिसून आल्याचा दावा कदम यांनी केला. भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वारंवार उल्लेख केल्याने ही खंत स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना कदम यांनी ही भूमिका मांडली. ‘भगव्याचा वारंवार उल्लेख म्हणजे हिंदुत्व सोडल्याची खंत’ राम कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करण्यात आला. त्यांच्यामते, या उल्लेखांमधून हिंदुत्वापासून दूर गेल्याची खंत दिसून आली. ‘ऑपरेशन टायगर ३’ची भीतीही त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाल्याचा दावा कदम यांनी केला. कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना त्यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात हिंदुत्व आणि भगव्या विचारसरणीवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या भूमिकेवरूनही उद्धव ठाकरेंना लक्ष्य उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राम कदम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी असलेल्या त्यांच्या राजकीय जवळिकीचाही उल्लेख केला. राहुल गांधी सनातन धर्मावर वारंवार टीका करतात आणि भगव्याचा दहशतवादाशी संबंध जोडतात, असा आरोप कदम यांनी केला. अशा भूमिका घेणाऱ्या राहुल गांधींसोबत उद्धव ठाकरे हातात हात घालून चालत असल्याचे ते म्हणाले. ‘संताजी-धनाजींचा दरारा होता, तसाच राऊतांना भीतीचा दावा’ राम कदम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या पराक्रमाचा दाखला देत त्यांनी ऐतिहासिक उपमा दिली. ‘मुघलांच्या काळात संताजी आणि धनाजी यांचा इतका दरारा होता की, तलावावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या त्यांच्या घोड्यांनाही त्यांचे प्रतिबिंब दिसत असे,’ अशा आशयाचे विधान कदम यांनी केले. त्यानंतर त्यांनी याच उपमेचा संदर्भ देत संजय राऊत आणि त्यांच्या पक्षावर निशाणा साधला. राऊत आणि त्यांच्या पक्षाने मोठे घोटाळे केल्याचा आरोप करत, त्यामुळेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नावे वारंवार घेत असल्याचा दावा कदम यांनी केला. राऊत यांच्या सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या पत्रकार परिषदांमध्ये या दोघांचा उल्लेख असतो, असेही ते म्हणाले. ‘राष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहण्यासाठी नावांचा उल्लेख’ संजय राऊत यांना राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची नावे घ्यावी लागतात, अशी टीकाही राम कदम यांनी केली. —————— हेही वाचा.. शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात: म्हणाले- गद्दारांना 50 खोके अन् शेतकऱ्याला 5 हजार? भाजपसोबत युतीत 25 वर्षे सडली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीपासून ते ‘ऑपरेशन टायगर’, हिंदुत्व, माध्यमांची भूमिका आणि भाजपच्या राजकीय रणनीतीपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. “गद्दारांना ५० खोके देतात आणि शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देतात,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले. तसेच भाजपने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून राजकीय फायदा घेतल्याचा आरोप करत त्याला ‘संभ्रम घोटाळा’ असे नाव दिले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *