Headlines

छत्रपती संभाजीनगरात भररस्त्यात तरुणाचा निर्घृण खून:आरोपींना अटक करा, तरच मृतदेह ताब्यात घेऊ; नातेवाईक आक्रमक




छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात एका तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बजरंग चौक ते बळीराम पाटील हायस्कूल रोडवर हा थरार घडला. एका अपघातानंतर झालेल्या वादानंतर तरुणावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर झाला खून प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावर आधी एक अपघात झाला. या अपघातानंतर वाद विकोपाला गेला आणि हल्लेखोरांनी तरुणावर शस्त्रांनी सपासप वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोरांनी तात्काळ घटनास्थळावरून पोबारा केला. हत्येचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख अद्याप समोर आलेली नाही. नातेवाईकांची आक्रमक भूमिका हत्येची माहिती मिळताच तरुणाच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नाही आणि ताब्यातही घेणार नाही, अशी ठाम आणि आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. वाहतूक कोंडी आणि पोलिसांचा फौजफाटा भररस्त्यात घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे बजरंग चौक ते बळीराम पाटील हायस्कूल रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. ——————— ही बातमी पण वाचा.. माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना भाजपचा पार्टी फंड पुरवला!:मनोज जरांगेंकडून स्फोटक ऑडिओ क्लिप जाहीर; शिंदे-फडणवीसांना षड्यंत्र थांबवण्याचा इशारा
“गेल्या 3 वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलन मोडून काढण्यासाठी आणि गरीब मराठ्यांच्या लेकरांचे हक्क संपवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून अत्यंत भयंकर व गलिच्छ षड्यंत्र रचले जात आहे. माझ्याच समाजातील काही पोरांना हाताशी धरून, त्यांना भाजपचा पार्टी फंड, उद्योगपतींचा पैसा, मोर्चे आणि गाड्यांचा खर्च पुरवून माझ्याविरोधात रान उठवले गेले. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे वस्त्रहरण करणारा 32 मिनिटांचा पुरावा आज मी अखंड महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे षड्यंत्र तत्काळ थांबवले नाही, तर 1 ते 2 महिन्यांत असा बॉम्ब टाकेन की या राज्यात 2029 ला एकालाही तोंड दाखवायला किंवा पाय ठेवायला जागा उरणार नाही,” असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *