Headlines

ज्या विषारी सापाला दूध पाजले, तोच आता शिंदेंना दंश मारतोय!:500 कोटींच्या वाटपावरून जरांगे-शिंदेंची नार्को टेस्ट, ईडी चौकशी करा – नवनाथ वाघमारे




“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या ताटात माती कालवून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील नावाच्या ज्या विषारी कोब्रा सापाला दूध पाजले, तोच साप आता एकनाथ शिंदेंवर थेट फणा काढून दंश मारण्याचे काम करत आहे. जरांगे हे उपोषणात काजू, मटणाचे सूप पिऊन आणि संडास-बाथरूममध्ये गुपचूप खाऊन निव्वळ नौटंकी करणारे नेते आहेत. भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या चिरंजीवांमार्फत आलेल्या कथित 500 कोटी रुपयांमधील वाटपावरूनच आता यांच्यात वाद पेटला असून, या संपूर्ण प्रकरणाची ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ निकाल लागण्यासाठी एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे या दोघांचीही नार्को टेस्ट व ईडी (ED) चौकशी झाली पाहिजे,” असा अत्यंत स्फोटक आणि गंभीर आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे वास्तव, एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरवली गेलेली कथित आर्थिक रसद, मंत्र्यांची मध्यस्थी आणि 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारातील अंतर्गत समीकरणांची जाहीर पोलखोल केली. गोधडीतून काजू खाणारे अन् मटणाचे सूप पिणारे जरांगे ढोंगी आंदोलक! मनोज जरांगे यांच्या उपोषणावर थेट आघात करताना वाघमारे म्हणाले, “आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सातत्याने सांगत होतो की, जोपर्यंत एकनाथ शिंदेंचा जरांगेंच्या डोक्यावर हात होता, तोपर्यंत मराठा समाजातले कोणीही त्यांच्याविरोधात बोलायला तयार नव्हते. जरांगे हे खरे उपोषण कधी करतच नव्हते. गोधडीत तोंड लपवून काजू खाणे, मटणाचे सूप पिणे आणि संडास-बाथरूममध्ये जाऊन गुपचूप पोट भरून आंदोलनाचा देखावा करणे ही जरांग्यांची पद्धत होती. आता त्यांचेच जवळचे लोक हे सत्य महाराष्ट्रासमोर आणतील.” गोरगरीब मराठ्यांचे वाटोळे “हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडे-तिकडे पडायचे, कॅमेऱ्यासमोर रडून दाखवायचे आणि समाजाला भावनिक करून स्वतःचे घर भरायचे, असा हा सगळा प्रकार होता. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना शिक्षण आणि नोकरीत हक्काचे आरक्षण हवे होते; मात्र प्रस्थापित मराठ्यांच्या राजकीय स्वार्थासाठी बोगस कुणबी नोंदींच्या आधारे लाखो बोगस प्रमाणपत्रे वाटून ओबीसींचे अस्तित्व धोक्यात आणले. यातून गरीब मराठ्यांचा कोणताही फायदा झाला नाही. जरांग्याला गरीब मराठ्यांचा तर एकनाथ शिंदेंना ओबीसींचा शाप लागला आहे.” 500 कोटींच्या कथित वाटपावरून वाद; शिंदेंच्या मुलावर दलालीचा आरोप! दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या 500 कोटींच्या मुद्द्यावर वाघमारे यांनी धक्कादायक अंतर्गत माहिती मांडली. “विश्वसनीय सूत्रांनुसार, जरांग्यांचे आंदोलन चालवण्यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या चिरंजीवांमार्फत 500 कोटी रुपये आले होते. मात्र, यातील जरांग्यांच्या जवळच्या 3 लोकांना 100 कोटी रुपये गेले आणि उर्वरित रक्कम जरांग्यांच्या हातात थेट पडली नाही किंवा 300 कोटी जरांग्यांच्या लोकांनी नेले व 200 कोटी शिंदेंच्या चिरंजीवांनी दलाली म्हणून स्वतःकडे ठेवले, अशा चर्चा आहेत. यात आपल्याला अपेक्षित वाटा मिळाला नाही म्हणूनच जरांग्यांच्या तोंडातून ही आगपाखड बाहेर पडली आहे.” मंत्र्यांच्या भेटीगाठींचे गौप्यस्फोट “एकनाथ शिंदेंच्या रसदीवरच हे आंदोलन सुरू होते. मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रताप सरनाईक, तत्कालीन मंत्री संदिपान भुमरे आणि संजय शिरसाट हे मंत्री रात्री-अपरात्री जरांग्यांना भेटायचे आणि त्यानंतर लगेच जरांगे नव्या आंदोलनाची घोषणा करायचे. या सर्व आंदोलनाचा खरा कर्ताकरविता एकनाथ शिंदेच होते.” शिंदेंनी 18 पगड जातींसाठी खड्डा खणला; आता दोघेही ईडीच्या पिंजऱ्यात हवेत! ओबीसी आरक्षणाच्या नुकसानीवर बोलताना त्यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला. “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि ओबीसी समाजासाठी मोठा खड्डा खणला. बोगस जीआर (GR) काढून आणि बोगस नोंदींवर लाखो कुणबी दाखले वाटून ओबीसींचे राजकीय खच्चीकरण केले. जर भाजपनेही शिंदेंच्या मुलामार्फत या आंदोलनाला 500 कोटी दिले असतील, तर भाजपनेही ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे का? आंदोलन सुरू ठेवण्यासाठी हे पैसे दिले होते का? याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी दिले पाहिजे.” नार्को टेस्ट आणि ईडी चौकशीची मागणी “भाजपचा कोणता बडा मंत्री आणि आमदार प्रसाद लाड जरांग्यांना भेटून आंदोलन चालवण्यासाठी काय प्रयत्न करत होते, हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे सरकारने आता वेळ न दवडता एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे या दोघांचीही तात्काळ नार्को टेस्ट करावी आणि ईडीमार्फत दोघांचीही संपत्ती व पैशांचे व्यवहार तपासले जावेत,” अशी जोरदार मागणी नवनाथ वाघमारे यांनी शेवटी केली. —————————————————————————– हेही वाचा… संजय राऊतांचा पुन्हा मोठा दावा:म्हणाले- पंतप्रधान मोदींची एक्सपायरी डेट संपली, एप्रिलपासून घसरगुंडीची सुरुवात, मे शेवटचा आठवडा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक्सपायरी डेट’ आता संपली असून, आगामी एप्रिल महिन्यापासून त्यांची घसरगुंडी सुरू होईल आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्यांचे सरकार कोसळेल, असा अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *