Headlines

राज ठाकरेंचे वक्तव्य म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने':पंतप्रधान देशाला नसतील या भाकितावर प्रवीण दरेकरांचा पलटवार




मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी 3 ते 4 महिन्यांमध्ये देशात मोठा बदल होईल आणि एक काळ असा येईल की देशाला पंतप्रधानच नसेल, असे खळबळजनक भाकीत वर्तवले होते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असतानाच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर जोरदार पलटवार केला आहे. प्रवीण दरेकर काय म्हणाले? प्रवीण दरेकर म्हणाले, त्यांचे वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असेच वर्णन करावे लागेल. कारण गणपती होते त्यावेळेला अशा प्रकारची दंगल होईल असे त्यांना वाटले होते. नवरात्री उत्सवात पण त्यांनी अशा प्रकारचे भाकीत केले होते. आणि राम मंदिराच्या वेळेला सुद्धा ठाकरे बंधू त्या ठिकाणी दंगे होतील अशा प्रकारच्या भूमिकेत होते, त्यांना वाटत होते. परंतु या ठिकाणी राम मंदिराचे सुद्धा निर्विघ्नपणे लोकार्पण झाले, सारे काही उत्सव सुरळीत होत आहेत. त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करत राहावी, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ एवढेच यावर त्या ठिकाणी सध्या तरी बोलावेसे वाटते, असा टोला दरेकर यांनी लगावला. दरेकर पुढे म्हणाले, गणपतीला, नवरात्रीला असेच भाकीत केले होते, राम मंदिर उद्घाटनावेळी सुद्धा दंगे होतील असेही त्यांना वाटत होते, मात्र सर्व उत्सव शांततेत पार पडले. त्यामुळे राज ठाकरेंनी स्वप्न पाहत राहावे. दरेकर ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. राज ठाकरे काय म्हणाले होते? देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढील 4 ते 5 महिन्यांत देशात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशात काहीतरी मोठी गडबड होईल, असा अंदाज व्यक्त करतानाच एका टप्प्यावर देशाला पंतप्रधानच नसण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले. सरकारकडून चुका सुरूच राहिल्या, तर देशभरातील लोक रस्त्यावर उतरले तरी आश्चर्य वाटणार नाही, असे भाकीत त्यांनी केले. पुढील काही महिन्यांत मोठी उलथापालथ होण्याचा दावा दसरा मेळाव्यांमध्ये झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांबाबत विचारले असता, राज ठाकरे यांनी आपण मेळावे पाहिले नसल्याचे सांगितले. राजकीय टीका-टिप्पणी होणारच असून, त्याला चिखलफेक म्हणायचे की आणखी काही, हा वेगळा मुद्दा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीवर बोलले गेलेच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात एप्रिल महिन्यापर्यंत केंद्र सरकारमध्ये बदल होईल आणि नरेंद्र मोदी यांना पायउतार व्हावे लागेल, असा दावा केल्याबाबत राज ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना, पुढील दोन ते चार किंवा पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होईल, एवढे निश्चित असल्याचे ते म्हणाले. येत्या काळात अनेक गोष्टी बाहेर येतील आणि सरकारकडून चुका सुरूच राहिल्या, तर ही परिस्थिती थांबणार नाही, असेही त्यांनी सांगितले. देशभरात आंदोलनांची परिस्थिती निर्माण झाली आणि अख्खा देश रस्त्यावर उतरला, तरी आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *