![]()
साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त घोराड येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. साईनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाचा आवाज आणि ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.
.
सोहळ्याची सुरुवात सकाळी मंगल स्नानाने करण्यात आली, त्यानंतर साईचरित्र पारायणाचे वाचन करण्यात आले. यावेळी परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सोहळ्यात साईबाबांची पालखी मिरवणूक विशेष आकर्षण ठरली. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि साईनामाच्या जयघोषात पालखी गावातून काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक भाविक सहभागी झाले होते. मिरवणुकीमुळे घोराड नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दुपारच्या सत्रात हभप निंबोरकर महाराज यांचे हरिकीर्तन झाले. त्यांनी साईबाबांच्या जीवनचरित्रावर आणि भक्तिमार्गावर मार्गदर्शन केले. सायंकाळी साईबाबांची महाआरती करण्यात आली.
यावेळी संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा प्रभाकर काकडे यांनी मांडला, तर शेषराव कडू यांनी मनोगत व्यक्त केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनिल गोरले, संजय काकडे, वासुदेव काळे, हरिभाऊ उमाळे, गजानन सांबारतोडे, स्वप्नील थोटे, तुषार थोटे, भूपेश कडू, शामकांत पाटील, योगेश कडू, भावेश कडू, वासुदेव नारिंगे, भानुदास गाडबैल, रमेश पाटील, विनोद लोखंडे, गंगाधर चौधरी, शैलेश वडस्कर, शैलेश लोणकर, निलेश लोणकर, अजय उमाळे आणि सचिन गाडबैल यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा उत्साहात पार पडला.
हरिकीर्तनातून साईबाबांच्या विचारांचा जागर दुपारच्या सत्रात हभप निंबोरकर महाराज यांचे हरिकीर्तन पार पडले. आपल्या सुश्राव्य कीर्तनातून त्यांनी साईबाबांचे जीवनचरित्र आणि भक्तिमार्गाचे महत्त्व विशद केले. भक्ती, श्रद्धा आणि सदाचाराचा संदेश देणाऱ्या कीर्तनाला भाविकांनी उपस्थिती दर्शवली. पंचक्रोशीतील अनेक भाविक कीर्तन ऐकण्यासाठी घोराड येथे दाखल झाले होते.