Headlines

मतदान हे व्यक्तिस्वातंत्र्याचे साधन, पण सरकारने त्यावरच घाला घातला:ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात, दुष्काळावर खडसावले‎




प्रतिनिधी | अकोला मतदान हे व्यक्तिस्वातंत्र्याच े साधन आहे, मात्र सरकारने एसआयआर प्रक्रियेचा नावाखाली मतदार याद्यांमधून मतदारांची नावे कापत त्यावरच घाला घातला, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते शहरातील क्रिकेट क्लब मैदानावर बुधवारी रात्री आयोजित धम्ममेळाव्यात अनुयायांना संबोधित करत होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दी बुद्धिष्ट सोससायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्ममेळाव्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक समानता, जाती अंत, लोकशाहीतील व्यक्तिस्वातंत्र्य, दुष्काळग्रस्त शेतकरी आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर रोखठोक भूमिका मांडली. अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी अनुयायांना मार्गदर्शन केले. भाषणाची सुरुवात करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कलिंगाच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने बुद्धाचा मार्ग स्वीकारला होता आणि याच मार्गाचा अवलंब करत १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेल्या वर्गाला मान-सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. देशातील जातीय व्यवस्था नष्ट करून व्यक्तिस्वातंत्र्य व समानता प्रस्थापित करणे, हाच बुद्धाचा व बाबासाहेबांचा खरा मार्ग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ॲड. आंबेडकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना दिवाळीनंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. दिवाळी संपताच भाजप खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घरासमोर रांगा लावून “आम्हाला खायला घाल आणि पाणी दे’ अशी मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. नाशिक कुंभमेळ्याच्या बैठका घेणारे सरकार दुष्काळग्रस्तांसाठी मदतीची घोषणा का करत नाही, असा सवाल केला. काँग्रेस- आरएसएस एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचाही केला आरोप सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस आणि आरएसएस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस पक्षाकडे जातीअंताचा कोणताही स्पष्ट मार्ग नाही. राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्षांच्या संदेशात विजयादशमी किंवा परिवर्तनाचा उल्लेखही आढळत नाही, अशी टीका त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्यासाठी स्वतःचे स्वतंत्र राजकारण करण्याचा मार्ग दाखवला होता; दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिऊन स्वाभिमान व स्वातंत्र्य टिकू शकत नाही. मतदानाचा अधिकार हे व्यक्तिस्वातंत्र्याचे मुख्य साधन असून त्यावरच गदा आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. पाच हजारांच्या दुष्काळी मदतीचा पंचनामा दुष्काळी परिस्थितीवर बोलताना ॲड. आंबेडकर यांनी शेतीचे झालेले नुकसान मांडले. पीक वाया गेले असून जेथे १० ते १२ क्विंटल कापूस होत होता, तेथे आता केवळ ३ ते ४ क्विंटलच उत्पादन येत आहे. सरकारने पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली असली, तरी जिओ-टॅगिंग, ७/१२ उतारा काढणे, अर्ज भरण्यातच ५,९७५ रुपये खर्च होत असल्याचा हिशोब त्यांनी मांडला. भारतीय बौद्ध महासभेतर्फे विजया दशमीच्या दुसऱ्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र दिन प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अनुयायांना संबोधित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *