![]()
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगिरांसाठी स्वामींच्या प्रसादरूपी खुराकाचे कीट वाटप करण्यात येत आहे. न्यासाकडून ऑक्टोबर महिन्यातील ७७ कीटचे वाटप गुरुवारी केले. तालुक्यातील जे पहिलवान कुस्ती सरावासाठी कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदी ठिकाणी आहेत अशा कुस्तीगरांसाठी न्यासाकडून गत मकर संक्रांतीला (जानेवारी-२०२४ या महिन्यात) उपक्रम सुरू केला होता. प्रारंभी ५० जणांना किट दिले. कुस्तीगीर कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदी ठिकाणी सराव करीत आहेत. मात्र त्यांची गरज ओळखून तालुक्याच्या चांद्या पासून बांध्यापर्यंतच्या कुस्तीगरांचा एका विशेष टीमच्या माद्यमातून सर्वे करून तालुक्यातील ७७ पैलवानांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान याकामी महाराष्ट्र केसरी पै.मौला शेख बादोला, पै.महेश कुलकर्णी, सरफराज शेख, अतिश पवार यांचे सहकार्य लाभले. अमोलराजे ग्रुपच्या आठ पैलवानांचे यश यामध्ये ८ पहिलवान राष्ट्रीय पातळीपर्यंत चमकले. पुरुषोत्तम कुलकर्णी, शशिकांत जुमाले, मशीद शेख, विकास बनसोडे यांनी राज्य हिंद केसरी स्पर्ध्येपर्यंत मजल मारली आहे. महिला पैलवानामध्ये अंकिता जाधव महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्ध्येमध्ये गोल्ड तर सावित्री बनसोडे हिने देखिल गोल्ड मिडल पटकवले आहे. या बरोबरच वेदिका सासणे हिने हरयाणा, राजस्थान, रांची, झारखंड येथील राष्ट्रीय स्पर्ध्येपर्यंत मजल मारली आहे. तालुक्यातील गोरगरीब कुस्तीगीरांसाठी न्यासाकडून प्रसाद रुपी खुराकाचे वाटप प्रती महिन्यास करण्यात येत आहे. या कीटमध्ये कुस्तीगीरांना आवश्यक तूप, बदाम, खारीक, बडीसोप, खसखस, इलायीची, धने आदि पदार्थांचे कुस्तीगरांसाठी श्रींचा प्रसादरूपी खुराकात या जीनंसांचा समावेश आहे. प्रारंभी ७ महिने ५० जणांना त्यानंतर मागणी वाढत गेल्याने ७ महिन्यानंतर २७ पैलवान वाढल्याने आजतागायत ३२ महिन्यात २ हजार २७५ किटचे वाटप करण्यात आले आहे.
Source link
कुस्तीगिरांना स्वामींचे प्रसादरूपी 77 खुराक कीट:श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून तालुक्यातील पहिलवानांना मिळाली अनाेखी भेट