Headlines

Raj Thackeray Facebook Post Targets Modi & Adani; Documentary Controversy


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत “पुढच्या ४ ते ५ महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होणार असून, संपूर्ण देश

.

राज ठाकरे यांनी ही डॉक्युमेंट्री शेअर करताना पोस्टमध्ये लिहिले की, सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल, ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर नक्कीच कळेल. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री नेटवर्कवरून हटवण्याआधीच सर्वांनी पाहून घ्या, असे त्यांनी म्हटले आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील एका डॉक्युमेंट्रीचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी ती सोशल मीडिया आणि यूट्यूबवरून हटवण्यासंदर्भातील कथित दबावावर प्रश्न उपस्थित केले. सबीर भाटिया असे नाव घेत त्यांनी संबंधित डॉक्युमेंट्रीचा संदर्भ दिला.

काय आहे या डॉक्युमेंट्रीमध्ये?

या डॉक्युमेंट्री फिल्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी उद्योगपती गौतम अदानी यांना कसा पाठिंबा व मदत देऊन उद्योग क्षेत्रात मोठे केले आणि त्याचा फायदा आपल्या राजकारणासाठी कसा करून घेतला, याचे विविध दाखले दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या डॉक्युमेंट्रीच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी ‘एक्स’ वरील अनेक अकाउंटधारकांना ही फिल्म हटवण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर थेट मनसे प्रमुखांनीच ही डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या- राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले की, 2018 पासून निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर करावा अशी माझी मागणी आहे. या मागणीसाठी आपण अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. तसेच तत्कालीन निवडणूक आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेलो होतो, असेही त्यांनी नमूद केले. त्या वेळी आपण मांडत असलेली भूमिका अनेकांना समजली नव्हती; मात्र आता निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा लोकांना समजू लागला आहे, असे ते म्हणाले. मतदान करताना आपण नेमके कोणाला मत दिले, याचे समाधान मतदाराला मिळाले पाहिजे. बॅलेट पेपरवर मतदान केल्यास आपण निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोरील मतपत्रिका मतपेटीत टाकल्याची खात्री मतदाराला मिळते. त्यामुळे मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वास असणे आवश्यक आहे.

तरुणांना आकर्षित करत सरकारविरोधी वातावरणनिर्मिती

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर राज ठाकरे यांनी थेट सरकारविरोधात आक्रमक आघाडी उघडली आहे. विशेषतः ‘जेन झी’ या तरुण मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करून सरकारविरोधी वातावरण तापवण्यावर मनसेचा भर दिसत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी थेट मोर्चासुद्धा काढला होता.

हे ही वृत्त वाचा पुढील 4-5 महिन्यांत देशात मोठी उलथापालथ होणार:राज ठाकरे म्हणाले, एक काळ असा येईल, जेव्हा देशाला पंतप्रधानच नसेल

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढील 4 ते 5 महिन्यांत देशात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशात काहीतरी मोठी गडबड होईल, असा अंदाज व्यक्त करतानाच एका टप्प्यावर देशाला पंतप्रधानच नसण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले. सरकारकडून चुका सुरूच राहिल्या, तर देशभरातील लोक रस्त्यावर उतरले तरी आश्चर्य वाटणार नाही, असे भाकीत त्यांनी केले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.