![]()
महावितरणसारख्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत असताना महिला कर्मचाऱ्यांना नोकरीसोबतच कुटूंबाची जबाबदारी सांभाळण्याचे दुहेरी आव्हान असते. ते आव्हान लिलया पेलताना जिल्ह्यातील काही महिला कर्मचाऱ्यांनी किडनी प्रत्यारोपण चळवळीसोबतच सामाजिक कार्यालाही गती दिली आ
.
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महावितरणतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील विद्याभारती महाविद्यालयाच्या सभागृहात या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांचे मनमोकळे कौतुक केले. महावितरणमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करताना स्वीकारावी लागणारी जोखीम आणि त्यासोबतच त्यांनी राखलेले सामाजिक भान हे निश्चितच स्पृहणीय आहे, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
यावेळी अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख, कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे व संजय शृंगारे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कल्पना भुले यांच्यासह जिल्ह्यातील महावितरणच्या महिला कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सहायक विधी अधिकारी आद्यश्री कांबे म्हणाल्या की, महिलांनी समाज कार्यासाठी आपल्या स्त्री शक्तीचा वापर करावा. स्व-अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी अनेकांना विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून किडनी प्रत्यारोपणासाठी योग्य मंच आणि कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे त्यांना ‘सर्वोत्कृष्ट विदर्भ महिला २०२५’ पुरस्काराने सन्मानीतही करण्यात आले आहे.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता रूपाली खोब्रागडे यांनी सामाजिक कार्याचे छंद जोपासण्याचे आवाहन केले. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन विविध संघटनांनी त्यांना ‘नवचेतना समाजरत्न’, ‘महाराष्ट्र समाजभूषण’ आणि ‘राष्ट्रमाता मातृसन्मान’ अशा पुरस्कारांनी गौरविले आहे. याशिवाय, तंत्रज्ञ असलेल्या माधुरी वानखडे यांनी ग्राहकसेवेला समर्पित काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक विकास बांबल यांनी केले, तर किरण रोहणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नाट्य क्षेत्रातही नाव एल.एल.बी. सारखे उच्च शिक्षण पूर्ण करत माधुरी वानखडे यांनी आवड जपल्याने एक उत्कृष्ट नाट्य कलावंत म्हणूनही जिल्ह्यात त्यांचे नाव आहे. मनीषा कांबळे म्हणाल्या की, पारंपरिक वृत्तीला छेद देत महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांनी वीज क्षेत्राच्या आव्हानात्मक कामातही स्वत:ला सिद्ध केले. ^मी महावितरणमध्ये सेवा देत असतानाच ग्राहक तक्रार निवारण मंचातही कार्यरत आहे. जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाशीही माझी संलग्नता आहे. माझ्यामते महिलांनी मनाशी खूणगाठ बांधली तर काहीही अशक्य नाही. त्यामुळे महिलांनी स्वत:ला सक्षम बनवायला हवे. सैन्याकडून ‘मेरी संतान’ सारखे पुरस्कारही मिळू शकतात. मी स्वत:च ते मिळवले आहे. – वैशाली अग्निहोत्री, अमरावती.
तब्बल २० महिलांनी मोडली चौकट आपण आणि आपली ड्युटी ही चौकट बहुतेक सर्वच महिला कर्मचारी पाळतात. जिल्हाभरात सुमारे १५० महिला महावितरणमध्ये काम करतात. यापैकी किमान २० महिलांनी ही पारंपरिक चौकट मोडून काहीतरी नवे काही करुन दाखवण्याचा ध्यास घेतला आहे.