देशात लवकरच पंतप्रधान नसतील असे खळबळजनक भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. तर, एप्रिल-मे महिन्यापासून मोदी सरकारची घसरगुंडी सुरू होईल, असा दावा शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला होता. या दोन्ही नेत्यांच्या दाव्यांवर भाजप नेते नवन
.
‘राज ठाकरेंना राऊतांची सवय लागलीये का?’
राज ठाकरेंच्या भाकितावर बोलताना नवनाथ बन म्हणाले, “हा देश संविधानाने चालतो आणि या संविधानानुसार २०२९ पर्यंत जनतेने भाजप आणि एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे देशात पंतप्रधान नसेल हे भाकीत पूर्णपणे अर्थहीन आहे. यापूर्वीही राज ठाकरेंनी गणपती, नवरात्र आणि राम मंदिर उद्घाटनावेळी दंगली होतील अशी भाकिते केली होती, ती सर्व खोटी ठरली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांसोबत मैत्री वाढल्यामुळे राज ठाकरेंनाही राऊतांसारखी खोटी भाकिते करण्याची सवय लागली आहे का? राऊतांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष बुडीत काढला, संपवून टाकला. आता राज ठाकरेंनी राऊतांच्या पावलावर पाऊल टाकले, तर उरल्यासुरल्या मनसेची अवस्थाही तशीच होईल. त्यामुळे राज ठाकरेंनी संजय राऊतांच्या नादाला लागू नये.”

‘एप्रिलमध्ये सत्तांतर झालंच, तर राऊत पक्षप्रमुख होतील’
मोदी सरकार कोसळणार या संजय राऊतांच्या दाव्यावर बन म्हणाले, “संजय राऊत, एप्रिलमधली घसरगुंडी सोडा, तुमच्या पक्षाचा पार घसरगुंडा झालाय आणि पक्ष रसातळाला गेलाय, त्याचे आधी आत्मचिंतन करा. १ एप्रिलला ‘एप्रिल फूल’ असते, तुम्ही स्वतःचे आणि उबाठा कार्यकर्त्यांचे एप्रिल फूल करून घेत आहात. २०२४ च्या निवडणुकीत जनतेने तुमचे एप्रिल फूल केलेच आहे. तुम्ही म्हणताय तसे एप्रिल-मे मध्ये सत्तांतर झालेच, तर ते उबाठा गटात होईल. कदाचित उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदावरून पायउतार होतील आणि संजय राऊत पक्षप्रमुख होतील, हेच ते सत्तांतर असेल.”
राहुल गांधी आणि व्हिएतनाम दौऱ्यावरून निशाणा
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्यावरून राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना बन म्हणाले, “अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः पंतप्रधान मोदींच्या कारभाराचे कौतुक करतात. त्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कुठे गेले यावर बोलण्यापेक्षा, तुमचे नेते राहुल गांधी सध्या कोणत्या दौऱ्यावर आहेत याचे उत्तर राऊतांनी द्यावे. राहुल गांधी व्हिएतनामला जाऊन देशात अराजकता पसरवण्याचा अजेंडा घेऊन येणार आहेत का? परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे हाच राहुल गांधींचा अजेंडा आहे.”
‘तुमच्या पक्षात लोकशाही आहे का?’
लोकशाही आणि संविधानाच्या मुद्द्यावरून उबाठा गटाला सुनावताना नवनाथ बन यांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्रातल्या जनतेनेच उबाठा गटाचा राजकीय गळा घोटून त्यांना सहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे राऊतांनी लोकशाहीची चिंता करू नये. तुमच्या पक्षात लोकशाही आहे की हुकूमशाही, हे महाराष्ट्राने ओळखले आहे. संविधानाची आणि लोकशाहीची चिंता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. तुम्हाला आता कोणीही ओळखत नाही, याचे तुम्ही आत्मचिंतन करावे.”
————————
हेही वाचा..
संजय राऊतांचा पुन्हा मोठा दावा: म्हणाले- पंतप्रधान मोदींची एक्सपायरी डेट संपली, एप्रिलपासून घसरगुंडीची सुरुवात, मे शेवटचा आठवडा असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक्सपायरी डेट’ आता संपली असून, आगामी एप्रिल महिन्यापासून त्यांची घसरगुंडी सुरू होईल आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्यांचे सरकार कोसळेल, असा अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सविस्तर वाचा